चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील जगन्नाथ बाबा मठ परिसरामध्ये गुरुवार 3 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास दुर्मिळ वन्यप्राणी खावल्या मांजर हे लोकवस्तीत आढळून आले.

ही बाब चंद्रपूर महापालिकेचे माजी उपमहापौर राहुल पावडे व त्यांच्या मित्र परिवाराच्या लक्षात येताच त्यांनी वन विभागाशी संपर्क साधून या दुर्मिळ खवल्या मांजरला जीवनदान दिले. सध्या चंद्रपूर शहरात व जिल्ह्यात रिमझिम पावसाच्या सरी सुरू आहे. अशातच जगन्नाथ बाबा मठ परिसर हा वनराईने नटलेला आहे याच परिसरात वनातून भटकून आलेले खवल्या मांजर सायंकाळच्या सुमारास या परिसरात दिसून आले.

ही बाब राहुल पावडे यांच्या लक्षात येताच त्यांनी चंद्रपूर वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घनश्याम नायगावकर यांना भ्रमणध्वनी द्वारे सदर माहिती दिली. एक दुर्मिळ प्राणी जगन्नाथ बाबा मठासमोर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान नायगावकर यांनी क्षणाचाही विलंब न करता वनविभागाच्या चमुला घटनास्थळी पाठविले.

तत्पूर्वी भारतीय जनता पक्ष महानगराचे माजी अध्यक्ष राहुल पावडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सदर प्राण्यावर लक्ष ठेवून राहण्यास सांगितले. तसेच सादर प्राण्याच्या रेस्क्यूसाठी भ्रमण ध्वनी द्वारे एनजीओ टीम ला देखील कळविण्यात आले आणि वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचल्यावर दुर्मिळ दिसणारा खवल्या मांजरला रेस्क्यू करून वनाअधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहराच्या मध्यभागी मध्यभागी लोक वस्तीत आढळल्याने या दुर्मिळ खवल्या मांजरला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळेस रेस्क्यूकार्यात वनाधिकारी घनश्याम नायगावकर यांच्या मार्गदर्शनात आरआरयु टीम प्रमुख डेविड दुपारे, मनोज चावरे व जलील यांनी सहकार्य केले. यानंतर वनविभागाच्या टीमने दुर्मिळ वन्यप्राणी खवल्या मांजर याला जंगलात सुखरूप निसर्ग मुक्त केले.