नागपूर: नागपूरसह राज्यभरात गणेशोत्सवात बघता- बघता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७४ हजार रुपयांपर्यंत गेल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली होती. परंतु गणेशोत्सव संपताच बुधवारी नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर नागपुरात सोन्याचे दर घसरले आहे. सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याने ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर नागपूरसह देशात प्रथम सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. परंतु त्यानंतर कधी दर वाढले तर कधी कमी होत आहेत. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ७ सप्टेंबरला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७१ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५५ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ६०० रुपये होते.

हे ही वाचा…नागपूर : राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा महाराष्ट्रात……… बावनकुळेंचा इशारा

गणेशोत्सवादरम्यानच हे दर १६ सप्टेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर ११ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७४ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार १०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली दिसत आहे. नागपुरात १८ सप्टेंबरला बाजार उघडल्यावर मात्र सोन्याचे दर घटल्याचे चित्र होते. बुधवारी (१८ सप्टेंबर) दुपारी नागपुरात २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याच्या दरात १६ सप्टेंबरच्या तुलनेत १८ सप्टेंबरला २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७०० रुपये, २२ कॅरेटचे दर ६०० रुपये, १८ कॅरेटचे दर ५०० रुपये, १४ कॅरेटचे दर ५०० रुपयांनी घटले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. दरम्यान सराफा व्यवसायिकांकडून हे दर येत्या काढात वाढण्याचे संकेत दिले जात आहे.

हे ही वाचा…बुलढाणा : “राहुल गांधींनी बाबासाहेबांची माफी मागावी, तरच…’ संजय गायकवाड यांनी सुचवला पर्याय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदीच्या दरातही मोठी वाढ

नागपुरातील सराफा बाजारात गणेशोत्सव दरम्यान १६ सप्टेंबरला चांदीचे दर ८९ हजार ५०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले होते. हे दर १८ सप्टेंबरला ८७ हजार ८०० रुपये नोंदवण्यात आले. त्यामुळे १६ सप्टेंबरच्या तुलनेत १८ सप्टेंबरला नागपुरात चांदीच्या दरात १ हजार ७०० रुपये प्रति किलो घट नोंदवण्यात आली.