राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात ‘संघर्ष’ नावाच्या पुस्तकाचे वाटप केले. दरम्यान, यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या रोहित पवारांना ‘संघर्ष’ शब्दाचा अर्थतरी कळतो आहे, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही लक्ष्य केलं. एपीबी माझा वृत्तवाहिनीला त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Maharashtra Assembly Session: सीमाप्रश्नावरून अजित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनीही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, “आधीच्या सरकारने…”

नेमकं काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

“रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या रोहित पवारांना संघर्ष शब्दाचा अर्थतरी कळतो का? रोहित पवारांनी असा कोणता संघर्ष केला आहे, की ते ‘संघर्ष’ नावाचं पुस्तक वाटत आहेत. अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. आज हे लोकं शाहू-फुले-आंबेडकरांची पुस्तकं वाटत आहेत. मात्र, शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेण्याची पात्रता पवार कुटुंबियांची नाही. ज्या पवारांनी चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगलं, त्यानंतर त्यांचाच पुतण्या या राज्याचा उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री आणि अर्थमंत्री होतो आहे. त्यांचीच मुलगी परत खासदार होते, त्यांचाच नातू परत आमदार होतो, हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या कोणत्या पुस्तकात लिहिले आहे?” असंही ते म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra Assembly Session: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे खोटं ट्वीट करणाऱ्याची माहिती मिळाली, एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले “कोणता पक्ष…”

सीमावादाच्या मुद्द्यावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस टीका केली. “इतके वर्ष जलसंपदा विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. मात्र, ते जत सारख्या दुष्काळी भागाला साधं पाणी देखील देऊ शकले नाही. मग सीमावादार बोलायचा तुम्हाला अधिकार तरी काय आहे?” असा प्रश्न त्यांनी विचारला.

हेही वाचा – Maharashtra Assembly Session: “ए शांत बसा रे”, CM शिंदे विरोधकांवर संतापले; अजित पवारांना म्हणाले “भुजबळांनी मार खाल्ला आणि त्यांच्यामुळे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहूजनाच्या मुलांना शिक्षण मिळावं, यासाठी रयत शिक्षण संस्थ्येची स्थापना केली होती. प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री हा रयत शिक्षण संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष राहील, हे या संस्थेच्या घटनेत लिहिले होते. मात्र, शरद पवारांनी ही घटना बदलली. याचे नेमकं कारण काय होतं? पदाचा गैरवापर करण्यात पवार कुटुंबीय पुढे आहे, मग कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? फुले शाहू आंबेडकरांचे नाव तुम्ही घेता आणि महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण करता? खरं तर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही”, असेही ते म्हणाले.