नागपूर : पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याला नागपुरात मारबत आणि बडग्याची मिरवणूक काढली जाते. याव्दारे समाजातील वाईट चालीरीतींवर प्रहार केला जातो. काळी व पिवळी मारबतचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. ही २५ ते ३० फूट उंच असलेली मारबत कशी तयार केली जाते याबाबत अनेकांना कुतूहल आहे.

काळ्या मारबतीची सुरुवात १८८० मध्ये पिवळ्या मारबतीची १९८४ मध्ये सुरुवात करण्यात आली आहे. या मारबतीची आता केवळ भारतात नाही तर देशविदेशात चर्चा व व वेगळी ओळख निर्माण झाली आहे. गेल्या ६० ते ७० वर्षांपासून पिवळी मारबत तयार करणारे गजानन शेंडे यांची आता तिसरी पिढी ही मारबत तयार करत आहे. मारबतीच्या प्रक्रियाबाबत गजानन शेंडे म्हणाले, पिवळी मारबत सुरुवातीच्या काळात ५ ते ६ फूट तयार केली जात होती मात्र कालांतराने त्यात बदल करत आता २५ ते ३० फूट बसलेली मारबत तयार केली जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात बांबू, कागद आणि खरड्याचा उपयोग करत असतो. जवळपास दोन महिने आधी जागनाथ बुधवारी परिसरात मारबत तयार करण्याचे काम सुरू केले जाते.

हेही वाचा – “दर्यापूरचे आमदार तिवसाच्या आमदाराच्या चपला उचलतात,” रवी राणांची टीका; म्हणाले, “नेत्याच्या खुर्चीला लाथ…”

हेही वाचा – यवतमाळ जिल्हा परिषदेतील बेशिस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; नियमावर बोट ठेवत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली दखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रारंभी बांबूच्या काड्यापासून मारबतीचा साचा तयार केला जातो. त्यानंतर काठ्या, बांबू, तरट, कागद , खरडे यापासून मोठे पुतळे बनवले जातात, त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळतात व विविध रंगांनी रंगविले जाते आणि त्यानंतर मारबतीला साडी नेसवून ती दर्शनासाठी ठेवली जाते. काळी मारबतसुद्धा याच पद्धतीने तयार केली जात असून तिला मात्र साडी घातली जात नाही तर वेगवेगळ्या रंगाच्या कागदांनी सजवून मारबत तयार केली जाते.