बुलढाणा: लाडक्या लेकीचा नवरा दारुड्या निघाला म्हणून तिला माहेरी आणले. पण तिथेही त्याचा रोजचा ‘तमाशा’ सुरूच राहिला. यामुळे पारा भडकलेल्या सासूने बॅटने केलेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यू झाला. शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील या घटनेसंदर्भात पोलिसांनी सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. दीपक गजानन हाडोळे (रा.शेगाव) असे मृत जावयाचे नाव आहे. दीपक दारूच्या आहारी गेल्याने त्याची पत्नी वैष्णवी (३०) ही माहेरी जवळा बु येथे राहत होती. मात्र व्यसनाचा आहारी गेलेला दीपक सासुरवाडीत येऊन गोंधळ घालत होता.

शुक्रवारी संध्याकाळी दिपक दारू ढोसून सासुरवाडीत आला. सासू सुशीला काळे यांच्या घरासमोर दारू पिऊन शिवीगाळ करू लागला. बंद घराच्या दारावर त्याने दगड व विटा भिरकावल्या . यामुळे राग अनावर झाल्याने सासूने दिपकच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि बॅटने दिपकला बेदम मारहाण केली. या मारहाणीत दिपकचा मृत्यू झाला. शेगाव ग्रामीण पोलिसांनी काल रात्री उशिरा आरोपी सासुविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : परदेशातील “रोझी स्टार्लिंग”ला आवडते उपराजधानी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्यसनाने तिघांचा केला घात!

दरम्यान अति तिथे माती प्रमाणे व्यसन किती घातक राहते याचा या घटनेने प्रत्यय आला. दारुड्या दिपकचा भीषण अंत झाला. सासू आता जेलात गेली तर आईच्या आधारे कसेबसे जीवन जगणारी वैष्णवी निराधार झाली आहे.