गोंदिया : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सतत ढगाळ वातावरण व त्यानंतर सर्वत्र थंडीची लाट पसरली होती. अशातच सोमवारी सायंकाळपासून वातावरणात गारवा निर्माण झाला होता आणि मंगळवारी अगदी पहाटे पाच वाजतापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गोंदियाकरांची झोपेतून उठताच एकच तारांबळ उडाली.

हेही वाचा : “प्रभू श्रीरामांप्रती काँग्रेसची आस्था तर भाजपचे राजकारण”, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणेंचा आरोप; म्हणाले, “आक्षेपांचे निराकरण झाल्यावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवकाळी पावसामुळे सकाळच्या सुमारास ऑफिस, शाळेत जाणाऱ्याची चांगलीच पंचाईत झाली. सकाळी पाच वाजतापासून सुरू झालेली पावसाची रिपरिप सकाळी ११ वाजतापर्यंत सुरूच होती. अवकाळी पावसाने गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगांव या तालुक्यात हजेरी लावली. सध्या गोंदिया जिल्ह्यात रब्बी पिकांचा हंगाम सुरू आहे. अवकाळी पावसामुळे हरभरा आणि तूर पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.