नागपूर : रेल्वे तिकीटांचा काळाबाजार टाळण्यासाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या असून ऑनलाईन तिकीट विक्रीतही काही निर्बंध घातले आहेत. परंतु त्यातून काही मार्ग काढत ई-तिकीट खरेदी-विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याचे दिसून आले आहे. ई-तिकीट बुकिंगसाठी लढवलेली शक्कल बघून तर रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस थक्क झाले.

सर्वसामान्य नागरिकांना सर्वात परवडणारा प्रवास रेल्वेचा आहे. त्यामुळे सदासर्वदा रेल्वेगाड्यांना गर्दी असते आणि कन्फर्म तिकीट मिळवणे फारच जिकरीचे काम झाले आहे. त्यामुळे तिकिटांचा काळाबाजार होण्याचे प्रकार वाढले आहेत. हे टाळण्यासाठी अनेक उपाय देखील करण्यात आले. आता तर ऑनलाईन तिकीट विक्रीतही काळाबाजारासाठी नवीन नवीन क्लृप्ती करण्यात येत आहे. या प्रकाराद्वारे अनेकदा कन्फर्म तिकीट मिळत असल्याचा दावा केल्या जात आहे. रेल्वेच्या ई- तिकिटाचे अवैध आरक्षण करून मिळविलेल्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका आरोपीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५४ ई- तिकिटे तसेच मोबाइल जप्त करण्यात आला.

हेही वाचा : गोंदिया जिल्ह्यात पुन्हा बसचा अपघात…चालक-वाहकाला…

रेल्वेच्या काळाबाजार करणारे एक मोठे रॅकेट अनेक वर्षांपासून नागपुरात सक्रिय आहे. हे आरोपी त्यांच्या संपर्कातील लोकांच्या ‘युजर आयडी’चा वापर करून वेगवेगळे शहर आणि वेगवेगळ्या रेल्वे गाड्याची तिकीटे खरेदी करतात आणि गरजू प्रवाशांना त्या विकतात. त्याबदल्यात ते एका तिकिटावर तिनशे ते पाचशे रुपये जास्त घेतात. नागपूर शहरातील जरीपटका, सदर, लकडगंज, धरमपेठ, खामला, सीताबर्डी, वर्धमाननगर, गांधीबागसह अन्य काही भागांत अशा दलालांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे.

हेही वाचा : विजयानंतरही शिंदे गटाचे संजय गायकवाड व्यथित; म्हणाले, “प्रतापराव जाधव, संजय कुटे यांनी काम केलेच नाही!…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहा तिकिटे, ४८ जुनी तिकिटे जप्त

लोहमार्ग पोलिसांच्या एका पथकाला गुरुवारी ई- तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली. त्यावरून सहायक पोलीस उपनिरीक्षक अश्विन पवार, मुकेश राठोड, सचिन दलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींना आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रेल्वेचे सहा लाइव्ह तिकीट तसेच ४८ जुने तिकीट तसेच मोबाइल जप्त करण्यात आला. एका तिकिटामागे २०० ते ३०० रुपये जास्त घेऊन हे तिकीट अवैधपणे रेल्वे प्रवाशांना विकत असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्याच्याविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम २४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. आरोपीचे नाव शुभम कमलाकर सूर्यवंशी असून तो बिनाकी ले-आऊटमधील यादवनगरात राहतो, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.