नागपूर: लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी हे नागपुरातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या भागावर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे प्रचाराची सुरुवातही राहुल गांधी विदर्भातील नागपूरमधून केली आहे. सुरेश भट सभागृहात राहूल गांधी संविधान संमेलनाला मार्गदर्शन करताना राहूल गांधी म्हणाले, संविधान स्वातंत्र्याच्या लगेच काढण्यात आले असा आरोप होतो. परंतु संविधानामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, भगवान बुद्ध अशा सर्वांचे विचार आहेत. संविधानामध्ये हजारो वर्षांपासून झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज आहे. भगवान बुद्ध, सम्राट अशोक आणि महात्मा गांधींचे विचार संविधानामध्ये होते. हे एक पुस्तक नाही तर तो जगणे आणि मरण्याची शिकवण देतो. संविधानात सर्व धर्माचा आदर, समान अधिकार हेच बोलले आहेत. संघ आणि भाजपचे लोक जेव्हा संविधानावर आक्रमण करतात तेव्हा ते केवळ यावर हल्ला करत नाही तर देशातील कोट्यवधी जनतेच्या आवाजावर हल्ला करतात.

‘आरएसएस’मध्ये समोर येण्याचा दम नाही

देशातील सर्व संस्था, निवडणुका, निवडणूक आयोग, शिक्षण संस्था, प्राथमिक, माध्यमिक सर्व शिक्षण, आरोग्याच्या सुविधा हे संविधान देते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक थेट संविधानावर आक्रमण करत नाही. त्यांनी समोरून जर थेट संविधानावर हल्ला केला तर दोन मिनीटात हरतील. त्यांना माहिती आहे की संविधानावर समोरून हल्ला केला तर आपण टीकू शकणार नाही. त्यामुळे छुप्या मार्गाने ते संविधानावर हल्ला करतात. विकास, प्रगती, राष्ट्रवाद अशा शब्दांचा आधार घेऊन संविधानावर हल्ला करतात. मात्र, त्यांच्या दम नाही, हिंमत नाही म्हणून असा छुपा वार करतात.

हे ही वाचा… नागपुरातील संविधान सन्मान संमेलन : विश्वंभर चौधरी म्हणाले ‘ ज्यांनी राष्ट्रपित्याला मारले….”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघाकडे पैसा आला कुठून?

संघाची मोठी इमारत आज पाहिली. कोट्यवधींची जमीन आहे. त्यांच्याकडे हा पैसा आला कुठून. शिशु मंदिर, एकलव्य स्कूल, यांच्या मागे लपून हल्ला करणाऱ्या संघाकडे इतका पैसा आला कसा. शिशु मंदिराच पैसा आला कुठून? असा प्रश्न राहूल गांधींनी उपस्थित केला. हा मध्यप्रदेश, राजस्थान सरकार आणि गुजराज मॉडेल, अंदानी अंबानी आणि रोड विकासाचा पैसा आहे असा आरोप राहूल गांधी यांनी केला.