अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या महाराष्ट्रातून लढण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी यांचे राजकीय सल्लागार आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी देखील त्‍याविषयी वक्‍तव्‍य केले आहे. प्रसार माध्‍यमांशी बोलताना यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या,  जर प्रियंका गांधी महाराष्‍ट्रात लोकसभेची निवडणूक लढणार असतील, तर ही सर्वात चांगली गोष्‍ट आहे. आम्‍ही त्‍यांचे स्‍वागतच करतो. अमरावती मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, म्‍हणून अडचण आहे. अन्‍यथा, प्रियंका गांधी यांना येथूनच लढण्‍याचा आग्रह केला असता.

हेही वाचा >>> “हे तर खुनी सरकार…” नांदेडच्‍या रुग्णालयातील मृत्‍यूसत्रावरून सुप्रिया सुळे यांची टीका; म्हणाल्या, “लोकांच्या मनात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी यशोमती ठाकूर यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन त्‍यांची भेट घेतली. यासंदर्भात विचारले असता,  यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, २०२४ ची निवडणूक आम्‍ही महाविकास आघाडी म्‍हणून एकत्रितपणे लढविण्‍याची तयारी केली आहे. सुप्रिया सुळे या सध्‍या विदर्भाच्‍या दौऱ्यावर आहेत. त्‍यांचा हा दौरा महाविकास आघाडीला उभारी देणारा ठरणार आहे.