लोकसत्ता टीम
वर्धा : मुलाने मागणी करावी अन् आईने मुलाच्या जिभेचे चोचले पुरवावे, हे चित्र नवे नाही. मात्र चुकून आवड पुरविली नाही म्हणून थेट आईवर प्राणघातक हल्ला करण्याची घटना आर्वी तालुक्यातील रोहणा गावी घडली.
येथील शिरधरे कुटुंबातील मुलगा अमोल याने घरी आल्यावर कशाची भाजी केली म्हणून आईस विचारणा केली. आईने वांग्याची भाजी केल्याचे सांगताच तो संतापला. ओरडा करीत त्याने शेवटी काठी घेत आईच्या डोक्यावर प्रहार करणे सुरू केले. परत वांगे केल्यास जीवाने मारून टाकील,अशी धमकी पण दिली.
आणखी वाचा-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक लाख हेक्टरी मदत द्या, आमदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मारहाणीत ४८ वर्षीय आईच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्यात. तिने पोलीसांकडे धाव घेतली.तक्रार दाखल झाल्यावर मुलगा अमोल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.