गोंदिया : गोंदिया – भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील आमदार, खासदार व माजी आमदार, खासदारांची कुंडली माझ्याकडे आहे, असा सूचक इशारा खा. प्रफुल्ल पटेल यांनी काल सडक अर्जुनी येथील एका कार्यक्रमात दिला होता. त्याला जोरदार प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी दिले आहे.

आज ८ मार्च अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रताप गडावर नाना पटोले यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, पटेलांकडे कुठली कुंडली आहे मला माहिती नाही. पण त्यांच्या माझ्याजवळ चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या कुंडल्या आहेत. ज्यावेळी त्या कुंडल्या काढायचा प्रश्न येईल त्यावेळी त्या काढल्या जातील.

हेही वाचा…देवेंद्र फडणवीस आता गीतकार झाले, वाचा कुणावर लिहिले गाणे…?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरुवात पटेलांनी करावी, शेवट आम्ही करू, अशा शब्दात पटोले यांनी पटेलांना थेट प्रतापगडावरून आव्हान दिले. पटोले म्हणाले, अशा कुंडल्यांमुळेच तर त्यांना गरज नसताना महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीत सहभागी व्हावे लागले. त्यामुळे त्यांनीच त्यांच्या कुंडल्यांची काळजी करावी. आम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही.