लोकसत्ता टीम

नागपूर : नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहणारे नंदनवन पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बनावट नोटा प्रकरण आणि गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात हलगर्जीपणा केल्यामुळे नंदनवन ठाण्याच्या तपास पथकातील ७ पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्या सर्व वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. दिलीप जाधव, संदीप गुन्दलवार, चंद्रशेखर कदम, आशीष राऊत, प्रेमकुमार खैरकर, नितीन मिश्रा आणि विनोद झिंगरे अशी उचलबांगडी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

आणखी वाचा-लाखोंचा खर्च, पण दुर्लक्ष! अनेक पोलीस आयुक्तालयांचे संकेतस्थळ अद्ययावत नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांपासून नंदनवन पोलीस ठाण्यातील कर्मचारी अवैध वसुली आणि गुन्हेगारांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासत असल्यामुळे चर्चेत होते. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमील अहमद यांचा मोहम्मद परवेज सोहेल, सलमान खान समशेर खान पठाण (२७) हसनबाग, आणि आशीष सोहनलाल बिसेन (१८) खरबी चौक यांनी गोळ्या घालून खून केल्याची घटना घडली होती. यामधील आरोपी सलमान खान हा कुख्यात असून तो कुख्यात गुंड आबू खानचा भाचा आहे. सलमानवर यापूर्वी अनेक दाखल असताना नंदनवन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांनी सलमानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. तसेच, नुकताच एटीएसने परवेज ऊर्फ पप्पू पटेल याच्या घरावर छापा घालून २७.५० लाख रुपये जप्त केले होते. पप्पू याच्यासोबतही डीबी पथकाचे अर्थपूर्ण संबंध असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी सातही पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करीत पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली.