चंद्रपूर: अतिशय दुर्मिळ असलेल्या ॲशिएटीक सॉफ्ट शेल टुरटेल या कासवाची २५ हजार रूपयात विक्री करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद भगाकार पोटे (३७), रा. भंगारपेठ ता. गोंडपिपरी व रविंद्र व्यंकोजी मडपल्लीवार (३५) रा. शिवणी देशपांडे, ता.गोंडपिंपरी या दोन जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दुर्मिळ कासव जप्त केला आहे. दरम्यान गुप्तधन शोधण्यासाठी या कासवाचा उपयोग केला जातो अशीही माहिती समोर येत आहे. गोंडपिंपरीचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक जिवन राजगुरू यांना गोपनिय माहितीच्या आधारे मौजा भंगारपेठ येथील संशयीत आरोपी प्रमोद भगाकर पोटे याचे घरी दुर्मिळ कासव असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोटे यांच्या घरी छापा टाकून घराची झडती घेतली असता त्याचे घरात एक ॲशिएटीक सॉफ्ट शेल टुरटेल या जातीचा कासव मिळाला.

हेही वाचा… नागपूर शहर पोलीस दलात लवकरच मोठे फेरबदल! अनुभवी निरीक्षकांना मिळणार ‘ठाणेदारी’

या दुर्मीळ प्रजातीचे कासव विक्रीसाठी बाळगुन असल्याचे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचे कासव इतर रविंद्र व्यंकोजी मडपल्लीवार याचे कडुन घेतल्याची माहिती दिली. या माहितीवरून प्रमोद भगाकार पोटे व रविंद्र व्यंकोजी मडपल्लीवार या दोघांना अटक केली. या कासवाची किंमत २५ हजार रूपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्मीळ प्रजातीचे कासव ताब्यात घेवुन वन परिक्षेत्र अधिकारी, धाबा परिक्षेत्र ता. गोंडपिपरी यांना पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्वाधीन करण्यात आले आहे.

हेही वाचा… गुजरातमधील दोषी व्यक्ती ‘माफसू’च्या कुलगुरूपदाच्या शर्यतीत! कुणाचा आहे दबाव….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जिवन राजगुरु, पोहवा वंदीराम पाल, नंदकिशोर माहुरकर, अनुप निकुरे, प्रेम चव्हाण. गोंडपिपरी तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोउपनि विनोद भुरले, पोहवा प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार आणि सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मुजावर अली व कार्तीक खनके यांनी केली आहे.