scorecardresearch

Premium

नागपूर – पोलीस शिपाई रायफल उभी ठेवून स्वच्छ करीत होता, अचानक…

उपराजधानीतील जरीपटका पोलीस ठाण्यात रायफल स्वच्छ करताना अचानक त्यातून गुरुवारी मध्यरात्री गोळी सुटली.

rifle fire nagpur
पोलीस शिपाई रायफल उभी ठेवून स्वच्छ करीत होता, अचानक… (प्रातिनिधिक छायाचित्र)

उपराजधानीतील जरीपटका पोलीस ठाण्यात रायफल स्वच्छ करताना अचानक त्यातून गुरुवारी मध्यरात्री गोळी सुटली. ही गोळी सिलिंगला लागली व त्यामुळे झालेल्या जोरदार आवाजाने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस शिपाई सचिन बडोले (३०) हे गुरुवारी मध्यरात्री जरीपटका पोलीस ठाण्यात होते. त्यांच्याजवळ असलेली एसएलआर रायफल उभी ठेवून ते त्याला स्वच्छ करीत होते. अचानक त्यातून एक गोळी ‘फायर’ झाली. ही गोळी थेट वरच्या सिलिंगला लागली. अचानक घटलेल्या प्रकाराने झालेल्या आवाजाने येथील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली. मात्र, सुदैवाने कुठलीही जीवहानी न झाल्याने सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

striped tiger spotted in the Chandrapur power station
Video: सावधान! वाघ फेरफटका मारतोय…
Amrit Kalash Yatra
मुंबई : महानगरपालिकेच्या अमृत कलश यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Repair work of water channel in Vikhroli completed
मुंबई: विक्रोळीतील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पहाटे पूर्ण; पाणीपुरवठा सुरळीत
five suspects arrested before robbery Dharangaon police jalgaon
दरोड्यापूर्वीच पाच संशयित जाळ्यात; धरणगावातील गस्ती पथकाची कारवाई

हेही वाचा – संमेलनाच्या मांडवातून.. नाथांचा नंदादीप!

हेही वाचा – विचारी लोक हीच हुकूमशहांची खरी चिंता! ; संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांचे परखड प्रतिपादन

तातडीने ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल आणि पोलीस उपायुक्त श्रवण दत्त, सहाय्यक पोलीस आयुक्तांना देण्यात आली. सगळ्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून चौकशी केली. या प्रकरणात पोलिसांकडून आंतर्गत चौकशीही केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rifle fire while cleaning by police constable in nagpur mnb 82 ssb

First published on: 04-02-2023 at 10:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×