अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणे ते नागपूर, नाशिक ते नागपूर, मुंबई ते नागपूर, नागपुर ते अकोला, नागपूर ते भुसावळ, सोलापूर ते नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा महत्वाचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे -नागपूर विशेष गाडी क्र. ०१२१५ ०१ ऑक्टोबर रोजी पुणे येथून १४.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०७.३० वाजता नागपूर येथे पोहचेल. ०१२१६ विशेष गाडी ०२ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून २३.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.२० वाजता पुणे येथे पोहचेल. या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा व अजनी येथे थांबा राहील.

नाशिकरोड ते नागपूर मेमो ०१२१७ विशेष गाडी ०१, ०२ आणि ०३ ऑक्टोबर रोजी नाशिकरोड येथून १८.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.०० वाजता नागपूर येथे पोहचेल. ०१२२४ विशेष गाडी ०२ ऑक्टोर रोजी नागपूर येथून १६.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.१५ वाजता नाशिकरोड येथे पोहचेल. ०१२२६ विशेष गाडी ०३ आणि ०४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून १२.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २३.१५ वाजता नाशिकरोड येथे पोहचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर विशेष गाडी ०१०१९ विशेष गाडी ०१ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.१० वाजता नागपूर येथे पोहचेल.

०१०२० विशेष गाडी ०२ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून २२.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहचेल. नागपूर -अकोला विशेष गाडी ०११३२ विशेष ०२ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून १८.४० वाजता सुटेल आणि अकोला येथे त्याच दिवशी २३.३० वाजता पोहोचेल. ०११३१ विशेष गाडी ०३ ऑक्टोबर रोजी अकोला येथून ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी ०४.५० वाजता पोहोचेल. या गाडीला अजनी, वर्धा ,पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर येथे थांबा राहील.

भुसावळ ते नागपूर क्र. ०१२१३ विशेष गाडी २, ३ आणि ४ ऑक्टोबरला भुसावळवरून ५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२.२० वाजता नागपूर येथे पोहचेल. ०१२१४ विशेष गाडी ०१, ०२ आणि ०३ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून २१.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.०० वाजता भुसावळ येथे पोहचेल. सोलापूर ते नागपूर विशेष गाडी देखील सोडण्यात येणार आहे.