नागपूर: प्रत्येक युवकाला सरकारी नोकरी मिळेलच याची काही खात्री नाही, त्यामुळे तरुणांनी उद्योग उभारणीकडे वळावे यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. महाविद्यालयीन किंवा आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात नवनवीन कल्पना असतात. पण त्याला मूर्त रुप मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या अशा नवसंकल्पनांचा शोध घेऊन त्यांचा उद्योजक होण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’स्पर्धा आयोजित केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

कोण असेल पात्र?

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालये तसेच आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या तीन विद्यार्थ्यांचा गट पात्र असेल. त्यांच्याकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात विविध शैक्षणिक संस्थांची याउपक्रमासाठी नोंदणी करून त्यातून एका संस्थेच्या माध्यमातून उत्तम दोन संकल्पनांची निवड केली जाईल. दुसऱ्या टप्यात सर्व संस्थांमधून आलेल्या एकूण संकल्पनांमधून सर्वोत्कृष्ट १०० संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड केली जाईल. यातून सर्वोत्कृष्ट १० विजेते निवडले जातील. विजेत्या गटांना प्रत्येकी १ लाख रुपयाचे बीज भांडवल देण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्यात ३६ जिल्ह्यांतून निवडलेल्या एकूण ३६० नवउद्योजकांच्या संकल्पनांचे राज्यस्तरावर सादरीकरण केले जाईल. यातून निवडलेल्या सर्वोत्कृष्ट १० नवउद्योजकांना प्रत्येकी ५ लाख रुपये भांडवल देण्यात येणार आहे.

हेही वाचा – वाघाच्या शिकारीसाठी ‘वन्यजीव गुन्हे नियंत्रण’ विभागातील माहितीचा वापर? सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – अधिकाऱ्यांना तंबी देत गडकरी म्हणाले, “आता पाऊस आला की मीच रस्त्यावर..”

अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळावर किवा स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजच्या पोर्टलला भेट द्यावी, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मनिष कुदळे (९३२४२८८७२१) आणि योगेश कुंटे (८९९९६९४२२८) यांच्याशी संपर्क साधावा.