प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. नागपूर मेट्रोच्या दोन मार्गिकेचे उद्घाटन तसेच समृद्धी मार्गाचे लोकापर्ण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहेत. याव्यतरिक्त शहरात आयोजित विविध कार्यक्रमांना मोदी उपस्थित राहणार आहेत. मोदींसोबत राज्यपाल, मुख्यमंत्री आदी अतिमहत्वाच्या व्यक्तींचे शहरात आगमन होणार आहे. त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीकोणातून नागपूर शहरातील वाहतूकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. मोदी ज्या मार्गावरुन जाणार आहेत त्या मार्गावर विविध ठिकाणी ‘बँरीकेडींग’ करून वाहतुकीवर निर्बंध घालण्याच्या अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

हेही वाचा- मोदींच्या नागपूर दौ-यात भाजपा शक्ती प्रदर्शन करणार; पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त गर्दी जमविण्याचे आदेश

मोदींच्या दौऱ्यादरम्यान वाहतूकीस अडथळा निर्माण होऊ नये तसेच सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये व वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी शहर पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत याप्रमाणे आदेश पारित करण्यात आले आहे. अतिमहत्वाचे व्यक्तीचे नागपूर दौरा प्रसंगी वाहतूक व्यवस्था बदल करण्यात आली आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या रोडवर यादरम्यान गर्दी राहील. या मार्गावर सकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. नागपूर रेल्वेकडे जाण्यासाठी प्रवाश्यांनी संत्रा मार्केट मार्गाचा वापर करावा. अमरावती मार्गे वर्धा करिता व जबलपूर मार्गे अमरावतीकडे जाणाऱ्या सर्व जड वाहनांसाठी झिरो पॉईन्ट ते समृद्धी महामार्ग (वायफळ टोल प्लाझा) हिंगणा गावाकडून झिरो पॉईन्टकडे येणारा मार्ग संपूर्ण वाहतूकीस बंद राहील.

हेही वाचा- एक तासाचा पंतप्रधानांचा दौरा, ७५ हजार कोटीचे प्रकल्प, महामार्ग, रेल्वे आणि मेट्रोही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमरावती मार्गावरून वर्धेकडे जाणारी वाहतूक ही मोंढा फाटा येथून उजवे वळण घेवून कान्होलीबारा मार्गे बुटीबोरी मार्गाचा वापर करतील. अमरावती मार्गे जबलपूर जाणारी वाहतूक व भंडारा मार्गे वर्धा, अमरावतीकडे जाणारी वाहतूक पारडी चौक, अॅटोमोटीव्ह चौक, मानकापूर चौक, नवीन काटोलनाका चौक, दामा टि पॉईन्ट, वाडी टि पॉईन्ट, अमरावती रोड या मार्गाचा वापर करतील. वर्धा मार्गे नागपूर शहरात येणारी वाहतूक ही बुटीबोरी येथून वळविण्यात येईल.