01 March 2021

News Flash

रोपवाटिकांनाही दुष्काळाची झळ

रोपांची निर्मिती, संगोपनासाठी पाण्याची उपलब्धता असणाऱ्या भागातच रोपवाटिका सुरू ठेवण्याचे नियोजन करावे लागले.

(संग्रहित छायाचित्र)

पाणी असणाऱ्या भागात रोपांची निर्मिती

वृक्ष लागवडीचा संकल्प तडीस नेण्याकरिता ज्या वाटिकांमध्ये रोपांची निर्मिती केली जाते, त्यांनादेखील दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. रोपांची निर्मिती, संगोपनासाठी पाण्याची उपलब्धता असणाऱ्या भागातच रोपवाटिका सुरू ठेवण्याचे नियोजन करावे लागले. मालेगाव, नांदगाव, देवळा, चांदवडसारखे भाग वगळून पाणी असणाऱ्या भागातून रोप निर्मितीचे प्रयत्न केले जात आहेत.

पुढील वर्षांत राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने विभाग, जिल्हानिहाय उद्दिष्टे देऊन तयारी सुरू करण्यात आली. नाशिक जिल्ह्य़ात वन विभागाला ३९ लाख, सामाजिक वनीकरण ३० लाख आणि वन विकास महामंडळाला १३.३४ लाख रोपांची लागवड करावयाची आहे. ग्रामपंचायतींसाठी ४४.२४ लाख, तर इतर विभागांना २०.७२ लाख रोपे लागणार आहेत. वृक्ष लागवड यशस्वी करण्यासाठी तितक्या रोपांची गरज भासणार आहे. गतवर्षीची २६.७० लाख रोपे शिल्लक असून नव्याने ६४.९५ लाख रोपांचे रोपवाटिकांचे उद्दिष्ट आहे.

दुष्काळात इतक्या मोठय़ा प्रमाणात रोपांची निर्मिती हे आव्हान असून निम्म्याहून अधिक तालुके दुष्काळात होरपळत आहेत. बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई असून शेकडो गावे-वाडय़ांना टँकरने पाणी दिले जात आहे. अल्प पाऊस झालेल्या भागातील रोपवाटिकांना दुष्काळाचे चटके बसत आहे.

रोपे तयार होण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रोपांची तहान भागविण्यासाठी पाणी उपलब्ध असणाऱ्या भागांना प्राधान्य देण्यात असून ज्या भागात पाणी उपलब्ध होणे अवघड आहे, तिथे रोप निर्मितीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या बदलाचा निर्धारित लक्षावर परिणाम होणार नसल्याची पुष्टीही अधिकाऱ्यांनी जोडली.

दुष्काळामुळे रोपांची निर्मिती, जुन्या रोपांचे संगोपन रोप वाटिकांसाठी आव्हान ठरले. मालेगाव, नांदगाव, देवळा आदी दुष्काळी परिसरात रोपांच्या निर्मितीचे काम थांबविण्यात आले. त्याऐवजी पाणी उपलब्ध राहील, त्याच परिसरात रोपवाटिकांमध्ये रोप निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. काही रोपवाटिकांमध्ये जुनी १८ महिन्यांची रोपे आहेत. त्यांचे संगोपनाची जबाबदारी रोपवाटिकांवर आहे. दुष्काळात रोप निर्मितीच्या कामात यंत्रणांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

रोपवाटिकांची सद्य:स्थिती

वन विभागाच्या पूर्व नाशिक, पश्चिम नाशिक, मालेगाव उपविभागात एकूण ४३ रोपवाटिका असून या रोपवाटिकांमध्ये सद्य:स्थितीत २६.७० लाख जुने रोपे शिल्लक आहेत. रोपवाटिकांना ६४.९५ लाख रोपवाटिकांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. नवीन रोपे आणि संगोपन करावयाची मिळून एकूण ९१.६५ लाख हे रोपवाटिकांचे उद्दिष्टे आहे. पावसाळ्यात काही रोपवाटिकांमध्ये १६.९ लाख रोपे तयार करण्यात आली. टंचाईमुळे अनेक रोपवाटिकांमध्ये रोपांची निर्मिती थांबवावी लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 2:48 am

Web Title: nursery also suffer from drought
Next Stories
1 रणजी सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी
2 महाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता
3 प्रयोगशाळा विस्तारीकरण मोरांच्या जिवावर 
Just Now!
X