नाशिक: दिंडोरी तालुक्यातील वणी स्थानकात बसच्या इंजिनने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. बसमधील २७ प्रवाशांना त्वरीत उतरवून आग विझविण्यात आली. वणी स्थानकात सकाळी साडेआठच्या सुमारास नाशिकहुन कळवणकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची पिंपळगाव आगाराची जादा बस उभी होती. बसमध्ये प्रवासी बसले होते. अचानक बसच्या इंजिनमधून धूर निघू लागला. इंजिनने पेट घेतला.

चालक बाबाजी गवळी यांनी प्रसंगावधान सर्व तऱ्हेची खबरदारी घेतली. वाहक ज्योती नाडे यांनी बसमध्ये असलेल्या प्रवाशांना खाली उतरविले. बसमधील अग्निरोधक सिलिंडर अकार्यक्षम असल्याने चालुच झाले नाही. गाडीचा गिअर सटकून गाडी मागे जाऊ लागली. त्यावेळी गाडी पूर्ण रिकामी होती. गाडीमागे कुठलीही दुसरी गाडी आणि प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. उपस्थित तुषार शर्मा, वर्तमानपत्र विक्रेते सुनील महाले, वाहतूक नियंत्रक के. के. चौरे, चालक गवळी यांसह उपस्थित प्रवासी आणि नागरिकांनी प्रसंगावधान राखत गाडीच्या चाकाखाली मोठे दगड टाकून गाडी थांबवली.

mother and her daughter dead body found in well near mundhegaon
नाशिक : मुंढेगावातील विहिरीत मायलेकीचे मृतदेह
dhule fake gst officer marathi news
धुळे जिल्ह्यात तोतया जीएसटी अधिकाऱ्यांचा धुमाकूळ, दोन मोटार चालकांना गंडा
nashik, 3 workers death
गुजरातमधील अपघातात नाशिकच्या तीन मजुरांचा मृत्यू
nashik lok sabha marathi news
भाजपच्या प्रभाव क्षेत्रात मतदान कमी कसे झाले? नाशिक लोकसभेसाठी ६०.७५ टक्के मतदान
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
lasalgaon, police arrested
नाशिक: लाच स्वीकारताना पोलीस नाईक जाळ्यात

हेही वाचा: धुळे जिल्ह्यात तोतया जीएसटी अधिकाऱ्यांचा धुमाकूळ, दोन मोटार चालकांना गंडा

बसमध्ये चालकाने ठेवलेल्या कॅनमधील पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, आग विझली नाही. स्थानकात असलेल्या प्रवाशांनी धाव घेऊन वाळू, माती, पाणी टाकून आग विझवली. चालकाचे सीट आणि जवळचा भाग खाक झाला. या बसमध्ये २७ प्रवासी होते. प्रवाशांना तातडीने गाडीबाहेर उतरविण्यात आल्याने कोणी जखमी झाले नाही.