लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित व्याख्यानातील आक्षेपार्ह विधानांसंदर्भात वक्त्यासह आयोजकांविरूध्दही भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आणखी वाचा-नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हिंदू युवा जागरण या कार्यक्रमाचे आयोजन अक्षय भडांगे यांनी केले होते. या कार्यक्रमातंर्गत आयोजित व्याख्यानात वक्त्या हर्षा ठाकूर यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करुन दोन समाजांमध्ये तेढ वाढेल, शत्रुत्व निर्माण होईल, अशी विधाने केली. या प्रकरणी आयोजक भडांगे आणि वक्त्या ठाकूर यांच्याविरूध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.