जलयुक्त शिवार निराशेला आशेत बदलण्याचा कार्यक्रम – राजेंद्र सिंह

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून दुष्काळी प्रदेश अधिक पावसाच्या प्रदेशात रूपांतरित करणे शक्य

नाशिक येथे आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह. समवेत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह व आदी

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून दुष्काळी प्रदेश अधिक पावसाच्या प्रदेशात रूपांतरित करणे शक्य असून ही योजना निराशेला आशेत बदलण्याचा कार्यक्रम आहे, असे मत जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
जलसंधारण व कृषी विभागातर्फे शनिवारी नियोजन भवन येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
जलसंरचनेवर अतिक्रमण, नद्यांचे प्रदूषण, भूजलाचा पुनर्भरणाऐवजी आधिक्याने वापर आणि पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे विवाद या आजच्या प्रमुख समस्या असल्याचे त्यांनी नमूद केले. या समस्यांच्या निराकरणासाठी जलसाक्षरतेच्या माध्यमातून नदी प्रदूषण टाळणे आणि जलसंरचना ओळखून पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. अशी जलक्रांती घडविण्याची प्रत्येकात क्षमता आहे.
जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या क्षमतेचा जाणिवेने वापर करून गावातील पाणी समस्या दूर करावी, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामस्थांनी एकत्र बसून पाणी कुठे अडवायचे आणि योजना कशा प्रकारे राबवायची याचा विचार करणे गरजेचे आहे. ओढय़ाचे पाणी वरील भागात अडविले तर मृतसंधारणाबरोबर पाण्याचे बाष्पीभवनही कमी प्रमाणात होईल.
पीकरचना निश्चित करताना पावसाचे प्रमाण आणि वेळापत्रकही लक्षात घ्यावे. केवळ आर्थिक लाभासाठी शेती केल्यास निसर्गातील संतुलन बिघडून त्यांच्या परिणामाला सामोरे जावे लागते, याची जाणीव राजेंद्र सिंह यांनी करून दिली. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जमिनीत पाणी जिरवून निसर्गाचे संतुलन राखता येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rajendra singh comment on jalyukta shivar scheme

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या