scorecardresearch

जळगाव : बस-दुचाकी अपघातात तीन युवक जागीच ठार

भरधाव बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी हा अपघात झाला.

Three youths died accident jalgaon
जळगाव : बस-दुचाकी अपघातात तीन युवक जागीच ठार (प्रातिनिधिक छायाचित्र)

जळगाव : भरधाव बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी हा अपघात झाला. याबाबत वरणगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – नाशिक सहकारी साखर कारखान्याजवळ बिबट्या जाळ्यात

हेही वाचा – जळगाव : तहसीलदार, नायब तहसीलदार वेतनवाढीसाठी सामूहिक रजेवर; तहसील कार्यालयांत कामकाज ठप्प

पोलीस सूत्रांनी सांगितले की, भुसावळ येथील आगाराच्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवरील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. सचिन शेळके, भागवत शेळके व जितेंद्र चावरे यांचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव फाट्यानजीक नागेश्‍वर मंदिर यादरम्यान घडली. हे तिन्ही युवक बोदवड तालुक्यातील मनूर गावातील आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रभारी पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, हवालदार पराग दुसाने यांच्यासह कर्मचार्‍यांनी पंचनामा केला. युवकांचे मृतदेह वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. याप्रकरणी वरणगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, हवालदार पराग दुसाने तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 19:23 IST
ताज्या बातम्या