नवी मुंबई : नवी मुंबई परिवहन उपक्रमाने प्रवाशांच्या मागणीची दखल घेत पनवेल ते बोरिवली अशी वातानुकूलित बससेवा १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पनवेल रेल्वे स्थानकातून ठरावीक वेळेत प्रवाशांना पनवेल ते बोरिवली रेल्वे प्रवास उपलब्ध आहे. याला मिळणारा प्रतिसाद पाहता बससेवेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी एनएमएमटी ही सेवा सुरू करीत आहे. वातानुकूलित बस मार्ग क्र. १२६ पनवेल रेल्वे स्थानक ते बोरिवली रेल्वे स्थानकासाठी ठाणे-बेलापूर रोड, घोडबंदर रोड या मार्गिकेने ही सेवा मिळणार आहे. एकूण ५ वातानुकूलित बस असून आठवडय़ात दररोज सकाळ व संध्याकाळी १० फेऱ्या असणार आहेत. ६३.६ कि.मी.चा प्रवास असून बसने १४० ते १९५ मिनिटांत बोरिवली गाठता येणार आहे.

असा असणार मार्ग

पनवेल रेल्वे स्थानक (प), पनवेल बस स्थानक, खांदा गाव कॉलनी, कळंबोली सर्कल/ एमजीएम हॉस्पिटल, कळंबोली कॉलनी, कामोठे गाव, कोपरा गाव, खारघर रेल्वे स्थानक, भारती विद्यापीठ, सीबीडी-बेलापूर, उरण फाटा, नेरुळ एलपी, तुर्भे नाका, खैरणे गाव, महापे नाका, घणसोली रेल्वे स्थानक, रबाळे रेल्वे स्थानक, ऐरोली रेल्वे स्थानक, दिघागाव, विटावा, कळवा, कोर्टनाका, आर.टी.ओ. कार्यालय ठाणे, माजिवाडा, पातलीपाडा, सूरज वॉटर पार्क, ओवळागाव, रेती बंदर, जकात नाका, गायमुख, घोडबंदर टोलनाका, काशिमीरा, दहिसर टोलनाका, नॅशनल पार्क व बोरिवली रेल्वे स्थानक असा प्रवास मार्ग असणार आहे.