News Flash

पर्याय मिळेपर्यंत कचरा तुर्भेतच!

तुर्भे येथील कचराभूमीमुळे परिसरातील रहिवाशांना श्वसनाचे विकार, त्वचारोग, संसर्गजन्य आजार होत आहेत.

तुर्भे कचराभूमीवर वारंवार कचऱ्याला आग लागते आणि परिसरात धूर पसरतो.

मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत कचराभूमीसाठी पर्यायी जागेची मागणी

तुर्भे येथील कचराभूमीशेजारील शिवशक्तीनगर, इंदिरानगर, आंबेडकरनगर, गणेशनगर आणि हनुमाननगर या वसाहतींमधील रहिवाशांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत; परंतु नवी मुंबई पालिका परिसर आणि सिडकोच्या वसाहतींमधील मिळून जमा होणारा कचरा पुढील काही दिवस तरी तुर्भेच्या कचराभूमीतच पडणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. तुर्भे येथील कचराभूमी बंद करण्याआधी पर्यायी जागेची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यात हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

नवी मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतील माहिती ‘लोकसत्ता महामुंबई’शी बोलताना दिली. ते म्हणाले की कचराभूमीवरील कंपोस्ट प्लान्ट चालू आहे. कचराभूमीवरील कामगार संरक्षक साहित्याचा वापर करीत नसतील तर त्याची चौकशी केली जाईल.

तुर्भे येथील कचराभूमीमुळे परिसरातील रहिवाशांना श्वसनाचे विकार, त्वचारोग, संसर्गजन्य आजार होत आहेत. त्यामुळे कचराभूमीला विरोध आहे. येथील ६० एकर जागेतील चार टप्पे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आता नवीन ३८ एकर जागेत पुन्हा कचराभूमी सुरू करण्यात येणार आहे. याला रहिवाशांचा विरोध आहे. तुर्भे येथील कचराभूमी हटविण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. नवी मुंबईतील दिवसाला सुमारे १०० टन ओला आणि ६५० टन सुका कचरा मिळून एकूण  ७५० टन कचरा तुर्भे येथील कचराभूमीत टाकला जातो. यात सिडकोच्या वसाहतींमधील कचरा टाकण्यात येत आहे.

रविवारी सकाळी सहाच्या सुमारास कचराभूमीला आग लागली होती. दुपारी १२.३० वाजेपर्यंत ती धुमसत होती. त्यामुळे कचराभूमीचा प्रश्न पुन्हा चिघळला आहे. कचराभूमीवर काही माफिया राडारोडा टाकत आहेत. त्याला आळा घालण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. कचराभूमीच्या बाजूने असलेल्या वसाहतींमधील रहिवाशी आणि औद्येगिक क्षेत्रातील कर्मचारी ये-जा करतात. त्यांच्या आरोग्यावर कचराभूमीतील दरुगधीमुळे परिणाम होत आहे. काहींना तर श्वास घेणेही अवघड होऊन बसले आहे. महापालिका शाळा क्रमांक २२-२३, तुर्भे स्टोअर, नागरी आरोग्य केंद्र १०० मीटरपेक्षा कमी अंतरावर आहे. शाळेत सुमारे दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना दरुगधीचा कमालीचा त्रास होत आहे.

प्रीती दंडगुले या विद्यार्थिनीने तर कचराभूमीतील दरुगधीमुळे मळमळणे, डोकेदुखीचा त्रास सुरू आहे. यामुळे अभ्यासात मन लागत नाही. मधल्या सुट्टीत जेवणाची इच्छा राहत नाही. याशिवाय वर्गात डासांचाही त्रास वाढला आहे. त्यामुळे वर्गात बहुतेक मुले आजारी पडत असल्याचे ‘लोकसत्ता महामुंबई’शी बोलताना सांगितले.

येथील ६० एकर जागेतील चार टप्पे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आता नवीन ३८ एकर जागेत पुन्हा कचराभूमी सुरू करण्यात येणार आहे. याला रहिवाशांचा विरोध आहे. तुर्भे येथील कचराभूमी हटविण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. नवी मुंबईतील दिवसाला सुमारे १०० टन ओला आणि ६५० टन सुका कचरा मिळून एकूण  ७५० टन कचरा तुर्भे येथील कचराभूमीत टाकला जातो. यात सिडकोच्या वसाहतींमधील कचरा टाकण्यात येत आहे.

रविवारी सकाळी सहाच्या सुमारास कचराभूमीला आग लागली होती. दुपारी १२.३० वाजेपर्यंत ती धुमसत होती. त्यामुळे कचराभूमीचा प्रश्न पुन्हा चिघळला आहे. कचराभूमीवर काही माफिया राडारोडा टाकत आहेत. त्याला आळा घालण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

कचराभूमीच्या बाजूने असलेल्या वसाहतींमधील रहिवाशी आणि औद्येगिक क्षेत्रातील कर्मचारी ये-जा करतात. त्यांच्या आरोग्यावर कचराभूमीतील दरुगधीमुळे परिणाम होत आहे. काहींना तर श्वास घेणेही अवघड होऊन बसले आहे. महापालिका शाळा क्रमांक २२-२३, तुर्भे स्टोअर, नागरी आरोग्य केंद्र १०० मीटरपेक्षा कमी अंतरावर आहे. शाळेत सुमारे दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना दरुगधीचा कमालीचा त्रास होत आहे.

प्रीती दंडगुले या विद्यार्थिनीने तर कचराभूमीतील दरुगधीमुळे मळमळणे, डोकेदुखीचा त्रास सुरू आहे. यामुळे अभ्यासात मन लागत नाही. मधल्या सुट्टीत जेवणाची इच्छा राहत नाही. याशिवाय वर्गात डासांचाही त्रास वाढला आहे. त्यामुळे वर्गात बहुतेक मुले आजारी पडत असल्याचे ‘लोकसत्ता महामुंबई’शी बोलताना सांगितले.

जून २०१५ पर्यंत तुर्भे क्षेपणभूमी बंद करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. याविरोधात स्थायी समिती, महासभेत आवाज उठविण्यात आला. प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी आहे, असे सांगितले जात आहे. प्रशासनाची ही चालढकल खपवून घेतली जाणार नाही. कचराभूमी बंद न झाल्यास ठाणे-बेलापूर मार्गावर आंदोलन करण्यात येईल. 

-सुरेश कुलकर्णी, स्थानिक नगरसेवक

दरुगधीमुळे रहिवाशांचा उद्रेक

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील कचराभूमीच्या निषेधार्थ परिसरातील रहिवाशांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेले ८ ते ९ महिने रहिवासी लढा देत आहेत. नुकतीच झालेली महासभाही या मुद्दय़ावरून तहकूब झाली होती. त्यावर लवकर तोडगा निघेल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

कचऱ्याचा वास आणि आगींमुळे पसरणारा धूर यामुळे येथील रहिवासी आणि आजूबाजूच्या कारखान्यांतील कामगार त्रस्त आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकांना दमा, त्वचा रोग, श्वसनाचे आजार झाले आहेत. तरीही पालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे लक्ष देत नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. येथे शाळा, नागरी सुविधा केंद्रे आहेत. मात्र कचराभूमीमुळे हा परिसर गर्दुल्ल्यांचा अड्डा बनत चालला आहे. महिलांची छेडछाडही होत आहेत.

आमच्या परिसरात दरुगधी पसरली आहे. दूषित वातावरणामुळे अनेकांना दम्याचा त्रास होत आहे. डोकेदुखी, मळमळ होणे असे त्रास होत आहेत. दूषित हवेत आमचा जीव गुदमरत आहे. या ठिकणी राहणे त्रासाचे झाले आहे.

– प्रवीण राठोड, रहिवासी, तुर्भे

दूषित हवा आणि दरुगधीचा समान करत रोजचा दिवस ढकलावा लागतो. या डम्पिंग ग्राऊंडमुळे वस्तीमध्ये उंदरांचा उपद्रव वाढला आहे. आजार पसरत आहेत. याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे.

– प्रल्हाद सेल्हाकर, रहिवासी, तुर्भे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 3:10 am

Web Title: turbhe dumping ground will not be closed till option get
Next Stories
1 शहरबात- नवी मुंबई : बेकायदा बांधकामांचे भागीदार
2 उरणला सर्वोत्तम बनवायचे आहे!
3 सिडकोची जमीन अतिक्रमणांना आंदण
Just Now!
X