मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर

कधी : सकाळी ८.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत

परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला (एलटीटी) जाणाऱ्या आणि तेथून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर धावतील. त्यामुळे जलद अप आणि डाऊन लोकल सेवेवर परिणाम होईल.

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर (पोर्ट मार्गिका वगळून)

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल ते ठाणे लोकल सेवा सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत आणि ठाणे ते पनवेल लोकल सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत रद्द असतील. ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी विभागात विशेष लोकल धावतील. ब्लॉक काळात ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स- हार्बर मार्गावरील लोकल सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक काळात बेलापूर/नेरूळ ते उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका सुरू असतील.

पश्चिम रेल्वे

कुठे : चर्चगेट – मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणाम : ब्लॉक कालावधीत चर्चगेट – मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व धीम्या लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर, चर्चगेटला जाणाऱ्या काही लोकल वांद्रे / दादर येथे अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.