नवी मुंबईः ऐरोली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील ठाणे-बेलापूर रस्त्यावर एका टेम्पोमधून चायनीज हॉटेल चालवणाऱ्या गाडीत सिलिंडरचा स्फोट झाला. यात जीवित हानी झाली नाही. मात्र अनधिकृत फेरीवाले स्टॉलधारकांकडून अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली असून बुधवारी उशिरापर्यंत कोणावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

रस्त्याच्या कडेला घरगुती सिलिंडर वापरून अन्नपदार्थ विकणारे अनेक टेम्पो व्यवसाय सर्वत्र सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार कारवाई सुरू केली आहे. वास्तविक ही कारवाई मनपाकडून होणे अपेक्षित आहे. मात्र रात्री सातनंतर कारवाई होत नसल्याने असे हॉटेल्स रात्री सात-साडेसातनंतर व्यवसाय सुरू करतात. अशाच एका टेम्पोसारख्या गाडीत चायनिक पदार्थ विक्री सुरू होती. मंगळवारी रात्री साडेआठ नऊच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच सिलिंडरचा स्फोट झाला. आगीत कोणीही

अनधिकृत व्यवसाय तेजीत

ऐरोली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील ठाणे-बेलापूर रस्त्यावर रात्री मोठ्या प्रमाणावर जड अवजड वाहनांची रेलचेल असते. तर हॉटेल्स बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस अनधिकृतपणे अनेक व्यवसाय सुरू आहेत. कित्येकदा तिथे फ्री स्टाइल हाणामारी, शिवीगाळ, वाहतूक कोंडीवरून वाद, दारू पिऊन मारामाऱ्या होतात. या घटनेनंतर प्रशासन योग्य ती पावले उचलतील अशी आशा व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमी झाले नाही. मात्र या आगीत गाडी जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दल, पोलीस व वाहतूक पोलिसांचे कर्मचारी तात्काळ पोहोचले असून आग आटोक्यात आणण्यात काही वेळातच यश आले. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले आहे बेजबाबदार व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला जाईल, अशी माहिती रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांनी दिली.