नवी मुंबई : नवी मुंबई परिसरात सिडको संपादित जमीन मोठया प्रमाणावर असून अशा ठिकाणी गुपचूप राडा रोडा टाकण्यासाठी आलेले डंपर पकडण्यात आले होते . हि कारवाई सिडको सुरक्षा मंडल अधिकारी आणि वाशी पोलिसांनी संयुक्त रित्या केली होती. मात्र पोलिसांनी अडवताच डंपर चालकांनी डंपर सोडून पळ काढला होता. त्यांना आज ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश आले आहे.
सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या जमीनीवर /भूखंडावर मोठया प्रमाणात अनधिकृतपणे डंपर वाहन चालकांकडून राडा रोडा टाकण्यात येतो. हा राडा रोडा मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असल्याचे निदर्शनास आले आहे.
अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी, सिडको यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रिकी विभाग याचे गस्ती पथक अशा गाड्यांवर लक्ष ठेऊन असते. याच पथकाला मंगळवारी मुंबईतून काही डम्पर नवी मुंबईत राडा रोडा टाकण्यास येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे सिडको अधिकारी आणि व नवी मुंबई पोलीस विभाग यांच्या सह सिडको कार्यक्षेत्रात मोहिम राबवत असताना मंगळवारी दुपारी ३:३० वाजताचे सुमारास मुंबई बाजूकडून येणारे डंपर क्रमांक एम एच ४३ सी के ७६८१ वरील चालक ईश्वर दिनु महतो, (वय २९ वर्षे, रा. मु. पो. पुनिया देवी, ०२, पोकरीया, भंडारा, बेकारो, नारायणपूर, झारखंड ) तसेच डंपर क्रमांक एम एच ४3 सीई ७२५८ , वरील चालक जलील फरदीन चुंगीवाले (वय ३७ वर्षे, रा. मु. पो. किणी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) हे डंपर चालक त्यांच्या ताब्यातील डंपर मधून मानवी आरोग्यास धोकादायक असलेला राडा रोडा आढळून आला. मात्र डंपर अडवल्यावर दोन्ही डंपर वरील वाहन चालक पळून गेले. पोलिसांनी त्यांचा शोध घेत त्यांना रविवारी ताब्यात घेतले.
ताब्यात घेत चौकशी केली असता हा राडा रोडा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात व जासई, उलवे परिसरात टाकण्यासाठी जातं. असल्याचे समोर आले. डंपर चालक ईश्वर दिनु महतो, आणि दुसरा चालक जलील फरदीन चुंगीवाले, यांच्याविरुध्द वाशी पोलीस ठाण्यात , भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१ आणि ६२ प्रमाणे रविवारी दुपारी तीन वाजता गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रीज टाकत असताना कोणी आढळल्यास सिडकोच्या www.cidco.maharashrta.gov.in या वेब साईटवर तसेच संबंधीत पोलीस ठाण्यात कळविण्यात यावे असे याव्दारे आवाहन सिडको ने केले आहे. करण्यात येत आहे.