उरण : आपल्या विविध मागण्यांसाठी ७ ऑक्टोबर पासून सिडको भवनच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेले शंभर दिवसांचे नवी मुंबई विमानतळ बाधितांचे आंदोलन अखेर गुरुवारी मागे घेण्यात आले. मात्र यावेळी झालेल्या चर्चेतील आश्वासनाची अंमलबजावणी सिडकोने न केल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

येत्या एप्रिल २०२५ ला नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होणार आहे. मात्र या विमानतळासाठी आपले सर्वस्व असलेल्या आपल्या जमिनी आणि राहती घरे देणाऱ्या भूमिपुत्रांचे पुनर्वसन अपूर्ण आहे. त्यांचे प्रथम योग्य पुनर्वसन करावे या प्रमुख मागणीसाठी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ कमिटी व किसान सभा यांच्यावतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. हे आंदोलन तब्बल शंभर दिवस सुरू होते.

हेही वाचा >>>कोल्ड प्ले निमित्त महामुंबईत सज्जतेची आखणी; कार्यक्रमासाठी नवी मुंबईत येणारा दहा हजारहून अधिक वाहने

याची दखल घेत सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांच्या सोबत आंदोलन कर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विमानतळ बधितासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे, शून्य पात्रता धारक प्रकल्पग्रस्तांचे वैयक्तिक अर्ज तपासणी, वाढीव घर भाडे देण्याचे तसेच वाघीवली गाव पुनर्वसनासाठी नव्याने प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमानतळ समितीचे अध्यक्ष अनिल पाटील, किसान सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, सचिव संजय ठाकूर, चांगुणा डाकी,किरण केणी म्हात्रे, संदीप पाटील,संजय पाटील, प्रविण मुठेनवार यांच्या शिष्टमंडळाने ही चर्चा केली