गुन्हे शाखेने दोन सराईत साखळी चोरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ६ हजार ६०० रुपये किमतीचे ७६ ग्रँम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपींच्या अटकेने ५ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: तुर्भेमध्ये वीज चोरी करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई

रिझवान, शेख, महमद कुरेशी, असे अटक आरोपींची नावे आहेत.नवी मुंबईतील सानपाडा येथील साखळी चोरी गुन्ह्याचा तपास करीत असतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या फुटेजचा मागोवा घेतला असता दुचाकीवरील आरोपी मुंब्राच्या दिशेने जाताना आढळून आले. त्यामुळे मुंब्रा परिसरातील अभिलेखावरील आरोपींचा शोध घेताना असता रिझवान आणि कुरेशी यांची ओळख पटली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शखाली पथकाने सापळा रचून आरोपींना राहत्या घरातून पकडून आणले.

हेही वाचा- उरणच्या वायू विद्युत केंद्र स्फोटातील आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही आरोपींनी सानपाडा येथील गुन्ह्याची कबुली दिलीच शिवाय कोपरखैरणे, आणि नेरूळ येथील प्रत्येकी दोन गुन्ह्यांचीहि कबुली दिली. अशी माहिती पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली. या पूर्वीही रिझवान याच्या विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाणे अंतर्गत ९, नेरूळ, कळवा, शिळ,मुंब्रा कळंबोली,येथे प्रत्येकी एक महात्मा फुले कल्याण – ५, नौपाडा – २,  बाजारपेठ कल्याण येथे दोन गुन्हे त्याच्या नावावर आहेत. तर महमद कुरेशी याच्या विरोधात शिळ, तळोजा, मुंब्रा प्रत्येकी एक तर महात्मा फुले कल्याण – ५ गुन्हे दाखल आहेत.अशी माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिह यांनी दिली.