14 August 2020

News Flash

जुनागढ राज्य स्थापना

गुजरातमधील दक्षिण सौराष्ट्रात असलेले जुनागढ हे शहर ब्रिटिशकाळात, 'ब्रिटिश संरक्षित जुनागढ संस्थाना'चे प्रमुख शहर होते. गुजरातची आजची राजधानी गांधीनगरपासून ३५० कि.मी. वर असलेल्या जुनागढचा उल्लेख

| July 17, 2015 02:56 am

गुजरातमधील दक्षिण सौराष्ट्रात असलेले जुनागढ हे शहर ब्रिटिशकाळात, ‘ब्रिटिश संरक्षित जुनागढ संस्थाना’चे प्रमुख शहर होते. गुजरातची आजची राजधानी गांधीनगरपासून ३५० कि.मी. वर असलेल्या जुनागढचा उल्लेख काही वेळा ‘योनागढ’ असाही केला गेला. अलेक्झांडरच्या नंतरच्या काळात इंडो-ग्रीक राज्यातील यवन म्हणजे ग्रीकांची येथे मोठी वसती होती.

अकराव्या-बाराव्या शतकात गुजरातवर सोळंकी घराण्याची सत्ता होती. १२९९ साली प्रथम गुजरातवर मुस्लिमांनी आक्रमण करून काही प्रदेश घेतला. १४०७ मध्ये गुजरातवर सुलतानशाही सुरू झाली. महमूद शाह प्रथम याने १४६७ साली जुनागढ घेऊन ते गुजरात सल्तनतमध्ये सामील केले. जुनागढचे नाव बदलून महमुदाबाद असे केले गेले. हा महमूद शाह पुढे महमूद बेगडा या नावाने प्रसिद्ध झाला. गुजरातच्या सुलतानांनी जुनागढमध्ये भक्कम तटबंदी, उद्याने, राजवाडे बांधून एक टुमदार शहरात रूपांतर केले. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी जुनागढच्या शेजारचे दीव हे बंदर घेताना एका तुर्की सेनाधिकाऱ्याने त्यांना विरोध करण्यासाठी जुनागढजवळच्या किल्ल्यात १५ फूट लांबीची प्रचंड मोठी तोफ उभी केली. ती तोफ आजही मोठय़ा दिमाखात उभी आहे.
पुढे जुनागढ राज्य मोगलांच्या अमलाखाली आले. गुजरातच्या मोगल सुभेदाराकडे नोकरीस असलेल्या मोहमद शेरखान बाबी याने जुनागढवर मराठय़ांनी केलेल्या आक्रमणानंतर मोगलांचे वर्चस्व झुगारून जुनागढवर स्वतचा अंमल बसविला. मोहमद शेरखान हा युसुफझाई पठाणांच्या बाबी घराण्यातला होता. त्याने जुनागढवर १७३० साली स्थापन केलेली बाबी घराण्याची सत्ता ते संस्थान १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत टिकली. sunitpotnis@rediffmail.com

विणण्याची पूर्वतयारी – वर्पिंग
कापड विणण्यासाठी मागाचा वापर केला जातो. मग तो माग हाताने चालवला जाणारा हातमाग असो किंवा विजेवर चालणाऱ्या मोटारने चालवला जाणारा साधा यंत्र माग असो किंवा स्वयंचलित मागही असू शकतो. इतकेच नव्हे, तर धोटारहित स्वयंचलित मागही असू शकतो. या सर्व मागावर कापड विणण्यासाठी काही पूर्वतयारी करावी लागते. त्यामध्ये उभ्या धाग्यासाठीची पूर्वतयारी वेगळी असते, तर आडव्या धाग्यासाठीची वेगळी असते.
वाइंिडगने तयार झालेले कोन किंवा चीज यावर गुंडाळलेले सूत जर का उभ्या धाग्याकरिता वापरायचे असले तर ते प्रथम ‘वाìपग’ या प्रक्रियेतून जाते. वाìपग करताना कापडाची रुंदी व त्यामध्ये असणारी धाग्यांची संख्या यानुसार रचना मोठय़ा ड्रमवर केली जाते. सफेद किंवा एका रंगाचे धागे असतील तर साध्या पद्धतीने वाìपग केले जाते. साधारणपणे ४०० ते ६०० कोन ठेवून त्यापासून प्रत्येक धागा एकमेकाला समांतर घेऊन वाìपग बीमवर म्हणजेच मोठय़ा ड्रमवर गुंडाळले जाते. यावर एकेरी धागे असल्यामुळे पुढे साइिझग- कांजी चढवण्याची प्रक्रिया केली जाते. याउलट जर का उभा धागा दुहेरी असेल किंवा वेगवेगळ्या रंगांचे धागे वापरावयाचे असतील तर सेक्शनल वाìपग केले जाते. यामध्ये विविध रंगांच्या उभ्या धाग्यांचा क्रम कापडात हवा असेल त्याप्रमाणे त्या त्या रंगांचे कोन क्रीलवर लावून घेतले जातात. तशी रंगीत सुताची रचना वाìपग बीमवर केली जाते. त्या ड्रमवरून हे सर्व धागे एकत्रितपणे मागावर लावायच्या बीमवर गुंडाळले जातात. या धाग्यांची लांबी कापडाचा प्रकार कोणता असेल त्यानुसार वेगवेगळी असते. या धाग्यांसाठी एकेरी धाग्यांसारखी साइिझगची गरज पडत नाही. त्यामुळे हे बीम लगेच पुढील ‘रॉईंगइन’ या प्रक्रियेकडे जाते. त्यामध्ये उभ्या धाग्याच्या घनतेनुसार धागे फणीच्या घरातून भरले जातात. तसेच सूतांकाच्या आणि उभ्या धाग्यांच्या घनतेनुसार वयांची निवड केली जाते. हे काम दोन व्यक्तींची एक जोडी करते. त्याकरिता आकडा असलेला डबल हूक वापरला जातो म्हणजे हे काम व्यवस्थित होते.

– महेश रोकडे (कोल्हापूर) office@mavipamumbai.org
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2015 2:56 am

Web Title: junagrah state ested
Next Stories
1 स्वयंचलित वाइंडिंग मशीन
2 चाकर..
3 रतलाम संस्थानचा कारभार
Just Now!
X