कृत्रिम बुद्धिमत्तेचा आज सर्वत्र वापर होत आहे. ती प्रचंड प्रमाणात माहिती वापरते. आपल्याला माहिती तीन प्रकारे मिळते. तोंडी, लेखी आणि दृष्यरूपात. यातील दृष्यरूपात उपलब्ध असलेल्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी संगणकीय दृष्टी या प्रणालीचा उपयोग केला जातो. मनुष्यप्राण्याला दोन डोळे असतात. या डोळ्यांनी मनुष्य जग बघत असतो. वस्तूपासून निघालेले प्रकाश किरण डोळ्यांवर पडले की त्याची प्रतिमा रेटिनावर पडते. या प्रतिमेचे विश्लेषण करून आपल्यापुढे कोणती वस्तू आहे ते मेंदू आपल्याला सांगतो. जर धोका असेल तर तिथून दूर जाण्याचा सल्ला देतो. याउलट जर ती वस्तू उपयोगाची असेल तर ती घेण्याचा सल्ला मेंदू आपल्याला देतो.

हेही वाचा >>> कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी

israel hamas war
अग्रलेख : नरसंहाराची नशा!
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
baba kalyani
अग्रलेख: तीन पिढय़ांचा तमाशा!
Vladimir Putin
अग्रलेख: ‘मी’ मज हरपून..

माणसाला जसे डोळे, रेटिना आणि मेंदू असतात तसेच भाग इतर प्राण्यांनादेखील असतात. त्यामुळे वस्तू पाहणे, ती ओळखणे, तिच्याशी आंतरक्रिया करणे अशा गोष्टी प्राणी आपल्या सोयीनुसार करतात. संगणकाला डोळे, रेटिना किंवा मेंदू हे भाग नसतात. परंतु या सगळ्या सुविधा त्यात यंत्राच्या स्वरूपात उपलब्ध करून दिलेल्या असतात. संगणकात असलेला किंवा त्याला जोडलेला कॅमेरा हे डोळ्याचे काम करतो. संगणकाची मेमरी ही माहिती अंकाच्या स्वरूपात गोळा करून ठेवते. संगणकाला जो काही अल्गोरिदम शिकवलेला असेल त्याच्या आधारे त्याच्यापुढे असलेल्या वस्तूचा अर्थ लावला जातो. त्याचबरोबर ती वस्तू ओळखणे, तिच्याबद्दल अधिक माहिती देणे, त्याचा उपयोग काय आहे हे सांगणे, अशी कामेही केली जातात.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. अंदाज वर्तविणारी (प्रेडिक्टिव्ह) कृत्रिम बुद्धिमत्ता. या प्रकारात संगणकाला पुरविलेल्या माहितीच्या आधारे अंदाज वर्तविण्यात येतात. जसे हवामानाचा अंदाज, वस्तू विक्रीचा अंदाज, देशाच्या प्रगतीचा अंदाज इत्यादी. दुसरा प्रकार म्हणजे नवनिर्मितीक्षम (जनरेटिव्ह) कृत्रिम बुद्धिमत्ता. या प्रकारात कृत्रिम बुद्धिमत्ता संपूर्णपणे नवीन काम करून देते. समजा आपल्याला एखाद्या विषयावर व्याख्यान द्यायचे असेल तर या प्रकारच्या बुद्धिमत्तेच्या मदतीने पॉवर पॉइंट बनवून घेता येते. एखाद्या घराची सजावट करायची असेल तर वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्यास कसे चित्र दिसेल याचे चित्र ही बुद्धिमत्ता निर्माण करते. तसेच वेगवेगळी वस्त्रप्रावरणे परिधान केल्यावर आपण कसे दिसू याचे चित्रण केले जाते. त्यानुसार आपण कोणते कपडे घ्यायचे याचा निर्णय घेऊ शकतो

– डॉ. सुधाकर आगरकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

सकंतेस्थळ : http://www.mavipa.org