scorecardresearch

पोलिसांच्या सतर्कतेमुळे दागिने हस्तगत

प्रामाणिकपणामुळे  पोलीस निरीक्षक बंडगर यांनी रोहित याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

डहाणू : डहाणू येथे एका महिलेची दागिन्यांची हरवलेली पर्स पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला परत करणाऱ्या इसमाचे व त्यांचा शोध घेणाऱ्या पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.

दागिने सापडलेला तरुण रोहित सुधीर झा (वय २२, रा. सरकार नगर, जीवदानी मंदिराजवळ विरार (पूर्व) या तरुणाचा शोध घेऊन त्या इसमास डहाणू पोलीस ठाण्यात बोलावून त्यांनी मोनिका तांडेल यांची पर्स व पर्समध्ये असलेले तीन तोळय़ाचे सोन्याचे गंठण व ७००० रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल परत करण्यात आला. प्रामाणिकपणामुळे  पोलीस निरीक्षक बंडगर यांनी रोहित याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.  मोनिका तांडेल हिने रोहित यास योग्य ते बक्षीस दिले आहे. डहाणू पोलिसांचे व रोहित सुधीर झा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मोनिका विनोद तांडेल (वय २८, रा. मांगेलआळी, केळवा) ही  गुरुवार, २० जानेवारी रोजी डहाणू गाव येथे आपल्या माहेरी आली होती. मोनिका डहाणू पोलीस ठाण्याच्या पाठीमागे भाजी मार्केटमध्ये भाजीपाला घेऊन डहाणू गाव येथे जाणाऱ्या रिक्षात बसून गेली. दरम्यान पारनाका येथे आल्यावर तिच्याजवळ असलेली पर्स व पर्समध्ये असलेली अंदाजे तीन तोळे सोन्याचे गंठण व ७ हजार रुपये रोख रक्कम व ई-श्रम कार्ड अशा वस्तू असलेली पर्स हरवल्याची लक्षात आले.

याबाबत तिने डहाणू पोलीस ठाण्यात कैफियत मांडली असता डहाणू पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी लागलीच दोन पथके तयार करून हरविलेल्या पर्सचा शोध घेण्याकरिता पाठवली.  पथकात असलेले सहायक फौजदार नलावडे, कहार, शिपाई साळुखे यांनी लागलीच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून व आपल्या गुप्त बातमीदारांमार्फत शोध घेतला असता ती पर्स वडकून नाक्यावर एका इसमास सापडली असल्याचे समजले.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jewelry recovred due to police effort zws

ताज्या बातम्या