पुणे : करोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुरवण्यात आलेल्या यादीतील
केंद्रांचे क्रमांकच संपर्क  क्षेत्राच्या बाहेर आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना इंजेक्शन मिळवण्यात ते क्रमांक उपयोगी ठरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

एक आठवडय़ापासून शहरातील नागरिकांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे मोठय़ा रुग्णालयांतील औषध विक्रीची दुकाने तसेच औषध विक्रे ते संघटनेच्या कार्यालयाबाहेर रांगा लावून रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. इंजेक्शन मिळवण्यासाठी नागरिकांची सुरू असलेली ही पायपीट पाहता विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालयांनीच रुग्णाला इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या कार्यालयाने शहरात रेमडेसिविर मिळण्याची ठिकाणे आणि त्यांचे संपर्क  क्रमांक अशी यादी प्रसिद्ध के ली. मात्र, ही यादीही नागरिकांसाठी उपयुक्त नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते  अंकु श काकडे यांनी स्वत: या क्रमांकांवर संपर्क  साधण्याचा प्रयत्न के ला असता त्यांपैकी बहुतांश क्रमांक बंद असल्याचे निष्पन्न झाले. काकडे यांनी ‘लोकसत्ता’ला याबाबत माहिती दिली.

काकडे म्हणाले,की जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या यादीत रेमडेसिविर मिळण्याचे ठिकाण आणि संपर्क  क्रमांक देण्यात आला आहे. मात्र, औषध विक्री के ंद्राचे के वळ नाव आहे, पत्ताही नाही. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक तेथे जाऊन औषध मिळवण्याचा प्रयत्न करू शकणार नाहीत. यादीत दिलेल्या जवळजवळ प्रत्येक क्रमांकावर मी स्वत: दूरध्वनी के ला, मात्र एकही क्रमांक लागत नाही. क्रमांक एक तर उपलब्ध नाही किं वा बंद आहे असे सांगितले जाते. या सगळ्या प्रकारात रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने या विषयावर मार्ग काढणे आवश्यक असल्याचे काकडे यांनी स्पष्ट के ले.

रेमडेसिविर इंजेक्शनचे रुग्णालयांना वितरण सुरू

सोमवारी (१२ एप्रिल) पुणे शहर व जिल्ह्य़ासाठी सहा हजार इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. हा पुरवठा कं पनीचे आगार व साठवणूकदारांकडून थेट करोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. रुग्णालयांद्वारे या इंजेक्शनचा वापर आवश्यक त्याच रुग्णांना के ला जातो किं वा कसे?, याबाबत पडताळणीसाठी आठ भरारी पथके  नियुक्त के ली आहेत. ही पथके  संबंधित रुग्णालये आणि घाऊक औषध विक्रे त्यांना भेटी देऊन त्यांचे अभिलेख तपासणी करत आहेत. रुग्णालये आणि त्यांच्याशी संलग्न औषध विक्रे त्यांनी त्यांची रेमडेसिविर इंजेक्शनची खरेदी व वापर याबाबतची माहिती दररोज सायंकाळी सात वाजता गुगलशिटवर नोंदवणे बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.