राज्य सरकारने कर्जमाफ़ीसाठी निर्णय घेताना जे निकष जाहिर केले आहेत ते आम्हाला मान्य नाहीत उलट सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी, अशी भुमिका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी मांडली. ते आज पुण्यातील मार्केटयार्ड येथे झालेल्या सुकाणू समितीच्या सभेत बोलत होते. सरसकट कर्जमाफी झाली नाही तर १५ ऑगस्टला राज्यात पालकमंत्र्यांना झेंडावदन करु देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. त्याचबरोबर ९ ऑगस्टच्या ‘मराठा मोर्चा’ला पाठिंबाही दर्शवला.
शेतकरी संघटनाची सुकाणु समितीची मार्केटयार्ड येथे बळीराजा एल्गार सभा घेण्यात आली. या सभेला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, बाबा आढाव, आमदार बच्चु कडु, जयंत पाटील आदी नेते आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या आधिवेशनात कर्जमुक्तीचा ठराव मांडुन सरकारला ही कर्जमुक्ती करण्यास भाग पाडु, असे आमदार जयंत पाटील यावेळी म्हणाले.
या केंद्र आणि राज्य सरकारने शेतकाऱ्यांची फसवणुक केली असून शेतकरी देशोधडीला लागला आहे. याकडे सरकारचे लक्ष नसून प्रत्येक दिवसाला आत्महत्येच्या घटना घडत आहे. त्यावर उपाय योजना सरकार करताना दिसत नाही. तसेच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे सातत्याने कर्जमुक्ती बद्दल वेगवेगळी भुमिका मांडत असल्याने राज्यातील शेतकरी संभ्रामावस्थेत आहे. र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन समितीची शिफारस लागु करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर येताच त्यांना याचा विसर पडला आहे. अशा शब्दांत शेतकऱ्यांनी यावेळी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2017 7:06 pm