News Flash

मुळशी, भोर आणि मावळ तालुक्यातील शाळांना उद्याही सुट्टी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आपत्कालीन आणि पूर स्थिती कायम असल्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

आठवडाभरापासून पुण्यात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे सोमवार, मंगळवार व बुधवारी जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सुट्टी जाहीर केली होती. त्यानंतर आता उद्या देखील मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या चार तालुक्यातील शाळांना सुटी देण्यात आलेली आहे.

आपत्कालीन आणि पूर स्थिती कायम असल्यामुळे उद्या गुरुवारी  पुणे जिल्ह्यातील फक्त मावळ, भोर आणि मुळशी या तीनच तालुक्यातील सर्व प्री स्कूल, प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 10:18 pm

Web Title: holidays to schools in maval mulshi bhor and velha taluka abn 97
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडच्या महापौरांनी केला हवेत गोळीबार?
2 पुण्यातील डॉक्टरांचा कौतुकास्पद निर्णय, पूरग्रस्तांच्या सेवेसाठी संपात सहभागी होण्यास नकार
3 पुणे-मुंबई ट्रेन अजून दोन दिवस राहणार बंद
Just Now!
X