20 October 2020

News Flash

पुणेरी पगडीवरून कोणाचेही मन दुखवण्याचा हेतू नव्हता-शरद पवार

पुणेरी पगडीच्या वक्तव्यावरून बराच वाद निर्माण झाल्यावर अखेर शरद पवारांनी स्पष्टीकरण देत आपली त्या वक्तव्यामागची भूमिका सांगितली.

पुण्यातील कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका मांडली. तसेच फुले पगडीवरून सुरु झालेल्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याच कार्यक्रमात  शरद पवार यांचा फुले पगडी घालून सत्कार करण्यात आला. पुणे महानगरपालिकेच्या वतीने पद्मावती येथील डॉ. कदम डायग्नोस्टिक सेंटर आणि स्वामी विवेकानंदचे भिंती शिल्पाचे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कामगार नेते बाबा आढाव, महापौर मुक्ता टिळक, खासदार वंदना चव्हाण,विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि स्थानिक नगरसेविका अश्विनी कदम,नितीन कदम,सुभाष जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

तीन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी यापुढे फुले पगडीनेच स्वागत करायचे असा आदेशच दिला होता. मात्र त्यांच्या या आदेशावरून प्रसारमाध्यमात बरीच चर्चा आणि टीकाही झाली. तसेच शरद पवार यांनी असे वक्तव्य का केले याबाबतही चर्चा रंगल्या. त्या चर्चांना पूर्णविराम मिळावा म्हणून शरद पवारांनी आजच्या कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले.

यावेळी शरद पवार म्हणाले की, समतेचा परिवर्तनाचा आणि विज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा फुले यांचा विचार पुढे नेण्याची ही सामाजिक आणि राष्ट्रीय गरज आहे.सातारा आणि कोल्हापूर छत्रपती आहेत.छत्रपती एकच असतात.शाहू महाराजाची पगडी सामान्याना उपलब्ध होत नाही.तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात हॅट वापरली असेल मात्र दैनंदिन जीवनात टोपी घालत नव्हते.म्हणून सर्वांसाठी महात्मा फुले यांचे पागोटे घातल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की,महापौर मुक्ता टिळक यांना विचारले की, तुम्हाला कार्यक्रमामध्ये मिळालेल्या भेट वस्तू काय करता असे विचारले तर त्या म्हणाल्या की,त्या भेट वस्तू ठेवण्यासाठी माझ्याकडे जागा नाही असे त्यानी सांगितले.राज्य घटना ही देशाचा आत्मा आहे. ती दिशा दाखवण्याचे काम होते म्हणून यापुढे कार्यक्रमामध्ये असे विचार असलेली पुस्तके आणि आदर्श व्यक्तीची पुस्तके लोकांना भेटू वस्तू स्वरूपात देण्याची गरज आहे.

यावेळी जेष्ठ कामगार नेते बाबा आढाव म्हणाले की, शरद पवार यांचा सन्मान महात्मा फुले यांचा पागोटे घालून सन्मान केला. तर सावित्रीबाई फुले यांचे स्मृती चिन्ह भेट दिले.पवार यांनी पागोटे दिले.त्यावरून बरीच चर्चा झाली.मात्र कोणी जर या पागोट्याला जातीचे प्रतीक मानत असतील.तर ती माणसे मनाने कोत्या मनाची आहेत.पागोट्या मागाच विचार महत्वाचा आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 2:09 pm

Web Title: i dont want to create controversy on puneri pagdi says sharad pawar in pune
Next Stories
1 महापौरांनी घेतला पहिला तास!
2 शाळेत पुन्हा किलबिलाट
3 शिवसेनेचा मुंबईप्रमाणे विरोधाचा पवित्रा नाही
Just Now!
X