News Flash

पुणे : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील सिंहाचा मृत्यू

शुक्रवारी रात्री या सिंहाचा मृत्यू झाला

पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील ९ वर्षांच्या सिंहाचा पक्षाघातामुळे मृत्यू झाला. गेल्या महिन्याभरापासून हा सिंह आजारी होता. या सिंहाचा मृत्यू शुक्रवारी झाल्याचे समजते आहे. तेजस असे या सिंहाचे नाव होते. गुजरातच्या सक्करबाग प्राणी संग्रहालयातील सिंह तेजस आणि सिब्बू यांना अडीच वर्षापूर्वी पुण्यातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आणण्यात आले होते. आशियाची सिंहाची तेजस आणि सिब्बू  ही महाराष्ट्रातली एकमेव जोडी होती. या दोघांनाही पाहण्यास पर्यटक येत. मात्र गेल्या महिन्याभरापासून हा सिंह आजारी होता. शुक्रवारी या सिंहाचा मृत्यू झाला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 3:06 pm

Web Title: lion death in rajiv gandhi zoo in pune because of paralysis scj 81
Next Stories
1 फेसबुकमुळे १५ दिवसांनी झाली वडील मुलाची भेट
2 पुणे-मुंबई रेल्वे १६ ऑगस्टपर्यंत बंद
3 पूरस्थितीमुळे दोन लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान
Just Now!
X