26 September 2020

News Flash

उच्चदाब मनोऱ्यावर मनोरुग्ण चढल्याने अनेकांची तारांबळ

पहाटे चारच्या सुमारास हा मनोरुग्ण त्याच्या राहत्या घराशेजारील खांबावर चढला.

चिंचवडेनगर येथील उच्चदाब मनोऱ्यावर रविवारी सकाळी एक मनोरुग्ण युवक चढला होता.

 

शर्थीच्या प्रयत्नानंतर दोरीने बांधून खाली उतरवले; चिंचवडेनगर भागातील घटना

उच्चदाब मनोऱ्यावर रविवारी सकाळी एक युवक चढला आणि त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेकांची तारांबळ उडाली. जवळपास ४० फूट उंचीवर गेलेला हा युवक काही केल्या खाली उतरत नव्हता. बरेच प्रयत्न करूनही तो दाद देत नव्हता. अखेर, पोलीस, अग्निशामक दलाचे जवान, वीजवितरणचे कर्मचारी व स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नाने सक्तीने त्याला खाली आणण्यात आले व सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला. चिंचवडेनगर येथील साई माउली कॉलनीत पहाटे चार ते सकाळी साडेसात या वेळेत हा प्रकार घडला.

समीर खान (वय २०, रा. चिंचवडेनगर) असे या मनोरुग्ण युवकाचे नाव आहे. त्यास उपचारांसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पहाटे चारच्या सुमारास हा मनोरुग्ण त्याच्या राहत्या घराशेजारील खांबावर चढला. सकाळी सातच्या सुमारास ही बाब नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर पोलीस तसेच अग्निशामक दलाला ही माहिती कळवण्यात आली. वीज पुरवठा बंद ठेवून नागरिकांच्या सहकार्याने या मनोरुग्णास खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, तो खाली उतरण्यास तयार नव्हता. जवळ येणाऱ्या प्रत्येकाला तो लाथा-बुक्क्य़ा मारत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यास ताब्यात घेण्यात यश मिळाले. त्याचे हात-पाय दोरीने बांधून त्याला सक्तीने खाली उतरवण्यात आले. त्यानंतर, यशवंतराव चव्हाण रुग्णालयात त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 3:27 am

Web Title: mental sick man climbed on high pressure tower in pimpri
Next Stories
1 मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी
2 ..नाहीतर भाजप सरकारला धडा शिकवावा लागेल: रघुनाथ पाटील
3 हायटेन्शन पोलवर चढून मनोरूग्णाचा गोंधळ
Just Now!
X