24 February 2021

News Flash

भाजपाचे कोणीही आमदार पवारांच्या संपर्कात नाहीत : चंद्रकांत पाटील

या सरकारमध्ये एवढी खुन्नस काढली जात आहे की, मतदारसंघातील साधी कामंही होत नसल्याचा केला आरोप

संग्रहीत छायाचित्र

राजकारणात अनेकांचे जुने संबंध असतात. काही आमदारांच्या कामानिमित्त भेटी होत असतात. त्यानुसार काही आमदार कामानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले असतील.  त्यावरुन भाजपाचे आमदार राष्ट्रवादीत जाणार असे बोलले जात आहे. मात्र भाजपाचे कोणीही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात नाहीत. असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट केले आहे. तसेच, या सरकारमध्ये एवढी खुन्नस काढली जात आहे की, मतदारसंघातील साधी कामंही होत नाहीत, अशा शब्दात महाविकास आघाडी सरकारवर चंद्रकांत पाटील यांनी यावेळी निशाणा देखील साधला.

पुणे महानगरपालिकेत कोथरूडचे आमदार भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या सोबत करोनाच्या पार्श्‍वभूमीवर बैठक झाली. त्यानंतर भाजपाचे काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असल्याबद्दल त्यांना विचारले असता, त्यांनी याबाबतची भूमिका मांडली.

पवार व महाविकासआघाडी त्यांच्या आमदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न करत आहे की, आपले आमदार जात नाहीत आम्हीच त्यांचे आणतो आहेत, असं देखील यावेळी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 4:42 pm

Web Title: no bjp mla is in touch with pawar chandrakant patil msr 87 svk 88
Next Stories
1 राम यांच्यानंतर पुण्याचे नवे जिल्हाधिकारी कोण?; ‘या’ तीन अधिकाऱ्यांची नावं आहेत स्पर्धेत
2 करोनाच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा आदर्श निर्णय
3 पुणे – नाशिक अंतर फक्त दोन तासांत
Just Now!
X