News Flash

आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या ‘तिचे’ प्राण, खाकी वर्दीतल्या ‘तिनं’ वाचविले

आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या महिलेचे प्राण खाकी वर्दीतील एका महिलेनेच वाचवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

घरात होत असलेल्या सततच्या कौटुंबिक वादातून हाताची नस कापून आणि विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या महिलेचे प्राण हडपसर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक राजश्री पाटील यांनी वाचविले आहेत. यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या महिलेचे प्राण खाकी वर्दीतील एका महिलेनेच वाचवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या घटनेबाबत हडपसर पोलिस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील म्हणाल्या, “शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हडपसर गाडीतळ परिसरातील एका महिलेने मी विषारी औषध प्राशन केले असून मला मदत पाहिजे आहे, अशी माहिती स्वतः फोन करून नियंत्रण कक्षा दिली. या घटनेची आम्हाला मिळताच, त्याच परिसरात असलेल्या बीट मार्शल अमोल बाबर आणि विलास राठोड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.”

“त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचल्यावर पाहणी केली असता घराच्या दरवाजाला आतमधून कडी लावली होती. त्यामुळे दरवाजा तोडून आम्ही घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी संबधित महिलेने हाताची नस कापल्याचे आणि विषारी औषध प्यायल्याने बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळले. त्यानंतर त्या महिलेला आम्ही रिक्षामधून तात्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, अपुऱ्या सुविधांमुळे तिथल्या डॉक्टरांनी दुसर्‍या रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार संबंधीत महिलेची प्रकृती पाहता तिला तातडीने दुसर्‍या रूग्णालयात दाखल केले त्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी तिच्यावर तात्काळ उपचार सुरू केले, त्यामुळे या महिलेचे प्राण वाचले.” अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील यांनी दिली.

दरम्यान, काही वेळाने शुद्धीवर आल्यावर संबंधित महिलेकडून आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण जाणून घेण्यात आले. त्यावेळी तिनं सागितलं की, घरात तिचे पतीसोबत सतत वाद होत होते. यातून जीवन संपविण्याचा निर्णय तिनं घेतला. मात्र, आता संबधित महिला धोक्यातून बाहेर आली असून तिची प्रकृती ठीक आहे. उपचारासाठी थोडा जरी उशीर झाला असता तरी त्या महिलेच्या जिवाला धोका होता, असे डॉक्टरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 4:35 pm

Web Title: one lady who trying to sucide rescue by other lady which is corp aau 85
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याचा धाक दाखवून १३ वाहनांची तोडफोड
2 ह्रदयस्पर्शी : आईवडिल नसलेल्या महिला कर्मचाऱ्याची पोलिसांनी भरली ओटी
3 पिंपरीत कंटेनर आणि दुचाकीची धडक, दोन ठार
Just Now!
X