News Flash

पिंपरी-चिंचवड शहर रेडझोनमधून बाहेर; दुकानं खुली झाल्याने मार्केटमध्ये मोठी गर्दी

फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा

पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळण्यात आलं आहे. त्यानंतर शुक्रवारपासून शहरातील दुकान खुली करण्यात आली. परंतु, दोन महिन्यानंतर दुकानं उघडण्यात आल्याने अनेक ठिकाणी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.

शुक्रवारपासून सम-विषम तारखेनुसार शहरातील सर्व दुकाने उघडण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरीत मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मार्केट आहे. दोन महिन्यानंतर इथली दुकानं उघडल्याने त्याठिकाणी ग्राहकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पिंपरी मार्केटमधील एकाच बाजूची दुकान उघडण्यात आली होती. दरम्यान, दुचाकीवरुन एकाच व्यक्तीला प्रवासाची मुभा असताना दोन व्यक्ती सर्रासपणे दुचाकीवरुन प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या आदेशाला अनेकांनी केराची टोपली दाखवली आहे.

करोनापासून बचावासाठी दुकांनामध्ये वस्तू विकत घेताना सॅनिटायझर आणि मास्क बंधनकारक आहे मात्र, काही दुकानदारांनी या नियमाचेही उल्लंघन केल्याचे दिसून आले. गेल्या दोन महिन्यांपासून पिंपरी मार्केट बंद होते, त्यामुळे आणखी गर्दी वाढण्याची शक्यता असून दुकानदारांनी नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 1:42 pm

Web Title: pimpri chinchwad city out of red zone large crowd in the market as all kinds of shops are open aau 85 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 GoodNews : पुण्यातील ससून रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी
2 ‘सहज बोलता बोलता’मध्ये दिलीप प्रभावळकर
3 सोहळा नाही, केवळ पादुकांची वारी!
Just Now!
X