17 January 2021

News Flash

पिंपरी-चिंचवड: लॉकडाउनमुळे जवळ पैसा नसल्यानं छापल्या ६ लाखांच्या बनावट नोटा; टोळी जेरबंद

प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला असलेल्या व्यक्तीने छापल्या ६ लाखांच्या बनावट नोटा

पिंपरी : एका व्यक्तीने सहकार्यांच्या मदतीने ६ लाखांच्या बनावट नोटा छापल्या.

कोट्यवधींचे कर्ज आणि लॉकडाउनमध्ये निर्माण झालेली पैशांची चणचण यामुळे एका व्यक्तीने मित्रांच्या मदतीने घरातच बनावट नोटा छापल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी पोलिसांनी हा प्रकार उजेडात आणला असून पाच जणांच्या टोळीला जेरबंदही करण्यात आलं आहे. साध्या कागदापासून ही टोळी नोटा तयार करत होती. त्यांच्याकडून प्रिंटर, रंग, स्कॅनर, कागदासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी सुरेश भगवान पाटोळे (वय ४०), प्रमोद अमृत गायकवाड (वय ३३) अख्तर इकबाल अकबर मिर्झा (वय ५७), खलील अहमद अब्दुलहमीद अन्सारी (वय ४०), नयूम रहीमसाहेब पठाण (वय ३३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील अख्तर हा मुख्य आरोपी असून तो एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत असल्याने त्याने बनावट नोटा छापण्याचे धाडस केले.

पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींवर कोट्यवधींचे कर्ज होते, त्यात लॉकडाऊन झाले. मात्र, देणेकरांचे पैसे कसे द्यायचे याच्या विचारात ते होते. अखेर आरोपी खलील अहमद याने अख्तर मिर्झाच्या मदतीने पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली घरकुल येथे राहात असलेला आरोपी सुरेश पाटोळे याच्या फ्लॅटवर बनावट नोटा छापण्याचे काम सुरू करण्याची योजना आखली. त्यानुसार, त्यांनी ६ लाखांच्या बनावट नोटा छापल्याही.

यांपैकी, काही नोटांवर रंग पसरल्याने त्या चलनात आणल्या नाहीत. मात्र, उर्वरित रक्कम त्यांनी एका कर्ज असलेल्या व्यक्तीला दिल्या. त्या व्यक्तीला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. यातील बहुतांश आरोपी हे रियल इस्टेटशी संबंधित आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 6:33 pm

Web Title: pimpri chinchwad counterfeit rs 6 lakh notes printed by a person due to lack of money due to lockdown aau 85
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदवार्ता, जवळपास वर्षभराची पाण्याची चिंता मिटली
2 VIDEO: शारदेसह विराजमान भारतातील एकमेव गणपती
3 VIDEO: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती
Just Now!
X