08 March 2021

News Flash

पिंपरी-चिंचवड : पवना धरण दुसऱ्यांदा ओव्हर फ्लो, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धरणातून १२ हजार ६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण हे यंदा दुसऱ्यांदा ओव्हर फ्लो झाले आहे. धरणातून १२ हजार ६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग पवना नदीत करण्यात येत आहे. गेल्या २४ तासात तब्बल १०६ मी.मीटर पाऊस धरण क्षेत्रात झाला असून पवना धरण यावर्षी दुसऱ्यांदा शंभर टक्के भरले आहे. दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ओव्हर फ्लो झाले आहे. धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले असून १२ हजार ६०० क्यूसेक पाण्याच्या विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त आहे. गेल्यावर्षी ३१७९ मी.मीटर एवढा पाऊस झाला होता. तर यावर्षी ३३३७ मी.मीटर पाऊस झाला आहे. धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करू नये. वीजेवरील मोटरी, इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच पशुधन यांचेही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जीवितहानी वा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

पाहा व्हिडिओ –

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 11:44 am

Web Title: pimpri chinchwad pavana dam overflow second time sas 89
Next Stories
1 मुंबईतील रस्त्यांवर पावसाचा ताबा; वाहतूक खोळंबली
2 पुणे : खडकवासलातून पाण्याचा विसर्ग वाढला, भिडे पूल पाण्याखाली ; सतर्कतेचा इशारा
3 मुंबईसह राज्यात कोसळधार, पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार
Just Now!
X