न होणाऱ्या कामांसाठी २० कोटींची निविदा प्रशासनाकडून तयार

पुणे : काम न करताही किं वा काम अर्धवट असतानाही ठेकेदारांना कामाची पूर्ण रक्कम दिल्याचे प्रकार महापालिके त यापूर्वी सातत्याने घडले असताना आता न होणाऱ्या कामांसाठी २० कोटी रुपयांच्या खर्चाचा घाट महापालिके ने घातला असल्याचे पुढे आले आहे. अतिक्रमणांमुळे आंबिल ओढय़ालगत सीमाभिंती उभारण्याची आणि ओढय़ाच्या रुंदीकरणाची कामे करता येणार नसल्याचे स्पष्ट असतानाही या कामांसाठी २० कोटींच्या खर्चाची निविदा प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे.

आंबिल ओढय़ालगतच्या झोपडपट्टी भागात सीमाभिंती बांधण्यासाठी तीन टप्प्यात महापालिका प्रशासनाने निविदा राबविली आहे. त्यासाठी २० कोटी रुपये खर्च होणार आहेत. सध्या ही कामे ठप्प आहेत. विविध प्रकारच्या अतिक्रमणांमुळे ही कामे होऊच शकणार नाहीत, असा अभिप्राय मल:निस्सारण विभागाने दिला आहे. अतिक्रमणांमुळे ओढय़ाचे रुंदीकरण करण्यातही अडथळे येत आहेत, असे या अभिप्रायात नमूद करण्यात आले आहे.

कामांची तीन टप्प्यात निविदा काढण्यात आल्यानंतर मल:निस्सारण विभागाकडून कामांसाठी जागेची पाहणी करण्यात आली. त्यावेळी रुंदीकरणासाठी आवश्यक जागा नसल्याचे पुढे आले. झोपडपट्टय़ा, लहान मोठी घरे आणि अन्य अतिक्रमणांनी आंबिल ओढय़ालगतचा परिसर व्यापला आहे. त्यामुळे ठेके दाराला प्रत्यक्ष काम करण्याचे कार्य आदेश अद्यापही देण्यात आलेले नाहीत आणि वस्तुस्थितीची टिपणी अतिरिक्त आयुक्त कार्यालयाला देण्यात आली आहे. ओढय़ालगतची अतिक्रमणे तातडीने काढावीत, रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मल:निस्सारण विभागाकडून करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी ओढय़ाला पूर आल्यानंतर प्रायमूव्ह या संस्थेकडून महापालिके ने तातडीने सर्वेक्षण करून घेतले होते. या संस्थेने ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला असून ओढय़ाची रुंदीही कमी झाल्याचा अहवाल महापालिके ला सादर के ला होता. या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करत आणि जागेची पाहणी न करता २० कोटींच्या खर्चाचा घाट का घालण्यात आला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. अतिक्रमणांमुळे सीमाभिंती उभारण्याचे काम होऊ शकणार नाही, हे ही स्पष्ट झाले असून ओढय़ाच्या रूंदीकरणातही अडथळे येणार आहेत.

आंबिल ओढय़ालगत अतिक्रमणे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र ही अतिक्रमणे शंभर टक्के  नाहीत. काही ठिकाणी एका बाजूला तर काही ठिकाणी दोन्ही बाजूला अतिक्रमणे आहेत. काही जागा अतिक्रमण मुक्त आहे. तेथे तातडीने कामे सुरू करण्यात येतील. अतिक्रमणे काढण्यासाठी संबंधितांना नोटीस बजाविण्यात आली आहे. टाळेबंदी, पावसाळा यामुळे अतिक्रमणांवर कारवाई करता आली नाही. गेल्या वर्षी पुरामुळे झोपडपट्टीलगतच्या भागात सीमाभिंती तातडीने बांधणे आवश्यक होते. त्यामुळेच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ही अतिक्रमणे काढून टाकली जातील.  त्याबाबतचा अहवालही क्षेत्रीय कार्यालयाकडून घेतला जाईल.

– शंतनू गोयल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

ओढय़ाची वहन क्षमता घटली

आंबिल ओढय़ाची रुंदी वीस मीटरवरून पाच मीटर एवढी झाली आहे. दहा किलोमीटर लांबीचा ओढा अत्यंत जीवघेणा झाला आहे. महापालिके च्या सर्वेक्षणातूनच ही बाब उघडकीस आली आहे. ओढय़ाच्या पात्रातील अतिक्रमणे, इमारती, सोसायटय़ांनी बांधलेल्या सीमाभिंती, पात्रात टाकण्यात येत असलेला राडारोडा, पात्र बुजविण्याचे प्रकार, मोठी झाडे यामुळे रुंदी वीस मीटरवरून पाच मीटर झाली आहे. ओढय़ाची पूरवहन क्षमताही तिपटीने कमी झाली आहे, असे प्रायमूव्हने के लेल्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.