News Flash

“राजीव सातव यांना काल रात्री थोडा त्रास जाणवला, मात्र ते लवकरच बरे होतील”

पुण्यातील जहांगीर रूग्णालयाच्या डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी दिली माहिती

संग्रहीत

काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांना करोनाची लागण झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर सध्या पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज (शनिवार) काँग्रेसचे नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रूग्णालयात जाऊन, सातव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेत विचारपूस केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ”राजीव सातव यांना काल रात्र थोडा त्रास जाणवला, मात्र ते लवकरच बरे होतील.” अशी माहिती देखील दिली.

काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार राजीव सातव हे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात जवळपास २० दिवसांपासून करोनावर उपचार घेत आहेत. सुरुवातीचे काही दिवस उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मात्र अचानक तब्येत खालावल्याने सातव यांना मुंबईला हलविले जाणार होते. मात्र तज्ज्ञ डॉक्टर आणि कुटुंबियांसोबत चर्चा केल्यानंतर पुण्यातच उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. दरम्यान काल रात्री त्यांची तब्येत थोडी बिघडल्याचीही माहिती आता समोर आली आहे.

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा

राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होतं. कोविडची लक्षणं दिसत असल्यानं त्यांनी २१ एप्रिल रोजी करोना चाचणी केली होती. २२ एप्रिल रोजी चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. अहवाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरूवातीला त्याची प्रकृती चांगली होती. मात्र, २५ एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयू वार्डात हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबई हलवण्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 2:39 pm

Web Title: suffered a bit last night but he will recover soon balasaheb thorat msr 87 svk 88
Next Stories
1 केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा
2 ‘तौत्के’ चक्रीवादळाचा राज्यालाही तडाखा?
3 शिक्षक भरती प्रक्रियेत १९६ उमदेवारांची निवड
Just Now!
X