News Flash

कचरा वेचणाऱ्या ३ अल्पवयीन मुली सुस गावातून बेपत्ता

हिंजवडी परिसरातील खळबळजनक घटना.

पिंपरी-चिंचवडमधील कचरा वेचणाऱ्या तीन बहिणी बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हिंजवडी परिसरातील तीन बहिणी कालपासून बेपत्ता आहेत. रुपाली, दिपाली आणि स्वाती या मुली बुधवार पासून बेपत्ता झाल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरातील सुस गावात ही घटना घडली. वीटभट्टीवर काम करणाऱ्या सुरेश देवकर यांच्या या तिन्ही मुली आहेत. या मुली कचरा वेचण्यासाठी गेल्या असता बेपत्ता झाल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली. रुपाली देवकर (वय १२), दिपाली देवकर (वय ८ ) आणि स्वाती देवकर (वय ६) अशी या मुलींची नाव आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून त्या बेपत्ता आहेत. देवकर कुटुंबीय दीड महिन्यापूर्वी सुसगाव मध्ये रहायला आले होते. यापूर्वी मुंबईमध्ये सुद्धा या मुली हरवल्या होत्या. बसमधून प्रवास करताना त्या चुकीच्या बसमध्ये बसल्या होत्या.त्यामुळं इथे ही असाच प्रकार झाला असण्याची शक्यता आहे. मुली बेपत्ता झाल्याची तक्रार हिंजवडी पोलिसात दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 2:56 pm

Web Title: three sisters missing in hinjewadi
Next Stories
1 दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाणाऱ्या गिरीश महाजनांनी राजीनामा द्यावा- अजित पवार
2 पिंपरी-चिंचवडमध्ये गाजरं दाखवून भाजपविरोधात आंदोलन
3 वाहतूक पोलिसांचा कारभार रोकडरहित
Just Now!
X