ट्रस्टच्या जागेसाठी आवश्यक असलेला अकृषक (एनए) प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तलाठ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ४२ लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शिरुरच्या तत्कालीन तहसीलदार रंजना उमरहांडे यांच्यासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- पुणे: वारजे, कर्वेनगर, कोथरूडचा पाणीपुरवठा गुरुवारी दिवसभर बंद

याप्रकरणी तहसीलदार उमरहांडे यांच्यासह शिरूर महसूल सहायक कार्यालयातील तहसीलदार स्वाती सुभाष शिंदे, शिरूरचे तहसीलदार सर्फराज तुराब देशमुख आणि मध्यस्थ दलाल अतुल घाडगे, निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या ट्रस्टच्या जागेचा एनए प्रस्ताव मंजुरीसाठी शिरुरचे तलाठी देशमुख यांच्याकडे देण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजुरीसाठी देशमुख याने लाच मागितली होती. वरिष्ठांना काही रक्कम द्यावी लागेल, असे त्याने तक्रारदाराला सांगितले होते. तक्रारदाराकडे ४२ लाख रुपयांची लाच मागितली होती.

हेही वाचा- राज्यपालांना पदमुक्त करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक संकेत

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीची पडताळणी करण्यात येत होती. तलाठी देशमुख यांनी ४२ लाख रुपयांची लाच मागितल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. स्वाती शिंदे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे उघडकीस आले. तहसीलदार उमरहांडे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मध्यस्थ दलाल घाडगे आणि निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजुरी मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे २० लाख रुपयांची लाच मागितल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा- पिंपरीत उपोषणाला बसलेले कामगार रुग्णालयात दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील, पोलीस निरीक्षक वीरनाथ माने आणि पथकाने ही कारवाई केली.