चांदणी चौकातील पूल पाडण्याबाबत नोएडातील ‘ट्विन टॉवर’ ही बेकायदा इमारत पाडणाऱ्या एजन्सीच्या पथकाने गुरुवारी चांदणी चौकातील उड्डाणपुलाची पाहणी केली. या पथकाच्या अहवालानंतरच हा पूल कसा पाडायचा, त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. या पथकाचा अहवाल दोन दिवसांत येणे अपेक्षित आहे.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू ठरलेला जुना पूल पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हा पूल नोएडा येथील ‘ट्विन टॉवर’प्रमाणे पाडण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यानुसार तो पूल पाडणाऱ्या एजन्सीशी संपर्क साधण्यात आला. त्या एजन्सीच्या तज्ज्ञांच्या पथकाने गुरुवारी दुपारी चांदणी चौकात पूल आणि आसपासच्या परिसराची पाहणी केली.

पुणे फेस्टिव्हलच्या निमित्ताने भाजपबरोबर ‘जवळीक’ साधण्याचा कलमाडींचा प्रयत्न

येथील तांत्रिक आणि भौगोलिक बाबींचा विचार करून तज्ज्ञांकडून अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामध्ये पूल पाडण्यासाठी कोणती पद्धत योग्य ठरेल, हे या अहवालात असणार आहे, अशी माहिती महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.