scorecardresearch

पुन्हा भरली सावित्रीबाई फुले यांची शाळा; भिडे वाड्यात मुलींच्या शाळा सुरू करण्याच्या ऐतिहासिक घटनेला १७५ वर्ष पूर्ण 

१ जानेवारी १८४८ पासून भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. या घटनेला १७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त स्त्री शिक्षणाची गंगोत्री असणाऱ्या भिडे वाड्यास मानवंदना देण्यात आली

पुन्हा भरली सावित्रीबाई फुले यांची शाळा; भिडे वाड्यात मुलींच्या शाळा सुरू करण्याच्या ऐतिहासिक घटनेला १७५ वर्ष पूर्ण 
भिडे वाड्यामध्ये मुलींच्या शाळा सुरू करण्याच्या ऐतिहासिक घटनेला १७५ वर्षपूर्तीच्या निमित्ताने अनोखा उपक्रम 

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले भिडे यांनी भिडे वाड्यामध्ये मुलींच्या शाळा सुरू करण्याच्या ऐतिहासिक घटनेला १७५ वर्षे पूर्ण होण्याच्या औचित्याने इतिहास प्रेमी मंडळातर्फे अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली. या निमित्ताने शनिवारी भिडे वाड्याशेजारी पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले यांची शाळा भरली.

हेही वाचा- पुणे : मेट्रोच्या कामासाठी कामगार पुतळा परिसरात वाहतूक बदल; शाहीर अमर शेख चौकाकडे जाण्यास मनाई

दिव्या सौरभ जगताप हिने सावित्रीबाई फुले यांची, तर अभिषेक शाळू यांनी महात्मा फुले यांची भूमिका केली. कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, शिक्षिका मनीषा पाठक आदी या वेळी उपस्थित होते. तर सुंदराबाई राठी प्रशाला आणि सेवा सदन संस्थेच्या रमाबाई रानडे प्रौढ प्रशालेतील विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभाग घेतला.

हेही वाचा- कोरेगाव भीमा परिसरात कडक बंदोबस्त; ड्राेन कॅमेऱ्यांची नजर; ७० जणांना सोहळ्याच्या ठिकाणी येण्यास मनाई

मृणालिनी कानिटकर जोशी म्हणाल्या, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी ज्ञानज्योत लावली आणि स्त्रियांचे आयुष्य उजळून निघाले. समाजाने त्यांचे ऋणी असायला पाहिजे. त्यांच्यामुळेच आपण अज्ञानाच्या अंधारातून बाहेर आलो. त्यामुळे स्त्रियांनी शिक्षण घेऊन घरी न बसता आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी काम केले पाहिजे. १ जानेवारी १८४८ पासून भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. या घटनेला १७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त स्त्री शिक्षणाची गंगोत्री असणाऱ्या भिडे वाड्यास मानवंदना देण्यात आली, असे शेटे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 19:53 IST

संबंधित बातम्या