Coronavirus : पुण्यातील काही भागांमध्ये निर्बंध अधिक कडक

पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिले आदेश

(संग्रहित छायाचित्र)

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील यापुर्वीचे सर्व मनाई आदेश कायम ठेवत पुणे शहर आयुक्तालयाच्या ठराविक भागात (करोना अतिसंक्रमणशील क्षेत्र) आज दि. 22 एप्रिल ते 23 एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत 12 वाजे दरम्यान अतिरिक्त मनाई निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या काळात संबंधित भागांमध्ये सकाळी 10 त दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ दूध विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुधाच्या वाहतुकीस बंधन घालण्यात आले नसले तरी दूध विक्रीची घरपोच सेवा देता येणार नाही. हे मनाई आदेश पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी काढले असून औषधं व दूध वगळता सर्व प्रकारच्या विक्रीस मनाई मनाई करण्यात आली आहे.

हे मनाई आदेश पोलीस, संरक्षण दल, आरोग्य विभाग, रुग्णालय, औषधालय, अत्यावस्थ रुग्णांची वाहतूक, करोना प्रतिबंधित उपाययोजना संबंधित पुणे महापालिका व शासकीय सेवा, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी(कर्फ्यू पाससह) पोलिसांनी दिलेले डिजीटल पासधारक तसेच पोलीस व शासनाचे इतर विभाग यांनी निर्माण केलेले परस्पर पुरक यंत्रणा यांना लागू नसतील. मात्र यासाठी त्यांचे अधिकृत ओळखपत्र, आवश्यक कागदपत्र व सदर विशेष कार्यासाठी नेमणुकीचे आदेश सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे.

नवीन प्रतिबंधित क्षेत्रात परिमंडळ एकमधील समर्थ, खडक व फरसखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व परिसर, परिमंडळ दोनमधील स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील गुलटेकडी, महर्षी नगर, डायस प्लॉट व बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीतील ताडीवाला रोड, परिमंडळ तीन मधील दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील जनता वसाहत, पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन परिसर तर परिमंडळ चारमधील येरवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मीनगर व गाडतीळ, खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील खडकी बाजार, कसाई मोहल्ला, पाटील इस्टेट झोपडपट्टी परिसर तसेच परिमंडळ पाचमधील कोंढवा पोलीस स्टेशन संपुर्ण कार्यक्षेत्र व वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील विकासनगर, सय्यद नगर, रामटेकडी, चिंतामणीनगर, वॉर्ड नं 24 परिसर, हांडेवाडी प्रभाग क्र. 26 व 28 परिसर यांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus in some parts of pune restrictions are more stringent msr 87 svk

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले
ताज्या बातम्या